घरमुंबईकुटुंबाचा अवयवदानाचा धाडसी निर्णय; दोघांना जीवनदान

कुटुंबाचा अवयवदानाचा धाडसी निर्णय; दोघांना जीवनदान

Subscribe

आपल्या घरातील मुलगा गेलेला असताना त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेणं, यासाठी खूप मोठं काळीज लागतं.

एखाद्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या धाडसी निर्णायमुळे जर अन्य दोघांना जीवनदान मिळणार असले, तर ही बाब खरंच कौतुस्पाद आहे. काहीसा असाच प्रकार घडलांय मुंबईलगत असलेल्या विरारमध्ये. विरार येथे राहणारा २७ वर्षीय तरुण कुटुंबियांसोबत फिरायला गेला होता. त्यावेळी त्याला अचानक चक्कर आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानंतर कळलं की त्याला ब्रेन हेमरज झाला आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. त्या अवस्थेत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. त्यामुळे, दोघांना जीवदान मिळाले आहे. जानेवारी पासून हे मुंबईतील ४३ वे अवयवदान आहे. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात घडली. या मुलाचे ह्रदय ६३ वयाच्या पुरुषाला आणि यकृत ५३ वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आलं आहे. या मुलाच्या अवयवदानामुळे यकृत आणि हृदयाची क्षमता संपत आलेल्या दोन रुग्णांना जीवदान मिळाले.

ह्रदय मिळलेले ६३ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी असून अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा यादीत होते. त्यांच्यावर झालेलं हे ८६ वे हृदय प्रत्यारोपण ठरले . तर, सोलापूर येथील ५३ वर्षाच्या रुग्णाचे यकृत अकार्यक्षम झाले होते. ते देखील प्रतीक्षा यादी होते. त्यांना यकृताचे दान करण्यात आले. समुपदेशकांच्या चर्चेनंतर कुटुंबियांनी त्याचे अवयवदान करण्याचे ठरवले. हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. त्यातूनच दोघांना अवयव मिळणे शक्य झाले.


वाचा: अवयवदानाची प्रक्रिया होणार सोपी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -