घरमुंबईबेस्ट- एसटी प्रशासनाकडून सवलती

बेस्ट- एसटी प्रशासनाकडून सवलती

Subscribe

अनुयायी प्रवाशांसाठी एसटीकडून अतिरिक्त बसेस

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीला येणार्‍या जनसमुदायाकरीता विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे. तर एसटी महामंडळाकडून सुध्दा दरवर्षीप्रमाणे मुंबई ते अलिबाग आणि दादर ते पनवेल मार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहेत.
चैत्यभूमी आणि शिवाजीपार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह,आंबेडकर कॉलेज इत्यादी ठिकाणी २९२ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. मार्ग प्रकाश दिव्यांचा वीज पुरवठा अखंडीत ठेवण्याकरीता १०० के.व्ही.ए. क्षमतेचे २ जनरेटर्स चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क तसेच ५०० के.व्ही.ए.क्षमतेचा १ जनरेटर ओम अपार्टमेंट उपकेंद्र व २५० के.व्ही.ए क्षमतेचा १ जनरेटर कॅडेल रोड उपक्रेंद येथे ठेवण्यात आलेला आहे. चैत्यभूमी आणि शिवाजीपार्क मैदान परिसरातील महापालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थाच्या मंडपांना तात्पुरती मीटर जोडणी धर्मदाय वीजदराने देण्यात येणार आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानात तात्पुरता वीज पुरवठ्यासाठी एक खिडकी योजना उभारण्यात आली आहे.

बेस्टच्या ४० जादा बसगाड्या धावणार
शुक्रवारी दादर स्थानक (प) ते शिवाजी पार्क मैदान व चैत्यभूमी इथे जाण्याकरिता दादर फेरी या नावाने अतिरिक्त बसफेर्‍या चालविण्यात येणार आहेत. गुरुवारपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत या फेर्‍या धावणार आहेत. तसेच गुरुवार (५ डिसेंबर) रात्री साडे आठ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बसमार्ग क्रमांक २४१,३५१ आणि ३५४ वर जादा बसगाड्या चालविण्यात येतील. शुक्रवारी बसमार्ग क्रमांक २७,२८,७९,८५,१६५,२४१,३०५,३५१,३५४,३५७,३८५,४४० आणि ५२१ मर्या. या मार्गावर एकूण ४० जादा बसगाड्या धावणार आहेत .

- Advertisement -

एसटीसुध्दा जास्त गाड्या सोडणार                                                                                        महापरिनिर्वाण दिनानिम्मित ६ डिसेंबर,२०१९ रोजी राज्यभरातील अनुयायी चैत्यभूमी मुंबई येथे येणार असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांतून गर्दीनुसार जादा बसेस सोडण्याच्या सूचना सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

एसटीच्या १०० जादा जादा बसेस
एसटी महामंडळातर्फे पनवेल – दादर, अलिबाग- पनवेल – दादर, “भिवंडी-दादर-मुंबई, या मार्गावर दिवस भरात १००फेर्‍या चालवण्यात येणार आहेत.त्यामुळे या मार्गावरील अनुयायांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -