घरताज्या घडामोडी'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावात मोफत केरोसिन वाटप!

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावात मोफत केरोसिन वाटप!

Subscribe

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बाधितांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली. राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसिन पुरवठा करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने  नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा आणि मेळावे इत्यादी प्रयोजनासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे.त्यानुसार  रायगड  जिल्ह्यात चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसिन वितरीत केले जाईल. तरत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अहवाल प्राप्त झाल्यानंतर ९४ हजार ५२६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसिन वितरित करण्यास नियतन मंजूर करण्यात आले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisement -

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो कुटुंबाना मदत मिळाली आहे. रायगडमधील ७ लाख ६९ हजार ३३५ तर रत्नागिरीयेथील ९४ हजार ५२६ नागरिकांना केरोसिन पुरवठा करण्यात आला आहे.


हे ही वाचा – एका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -