घरमुंबईतरुणीचे अश्लील व्हिडिओ तिच्याच पतीला पाठविले; जोगेश्वरीत डॉक्टरला अटक

तरुणीचे अश्लील व्हिडिओ तिच्याच पतीला पाठविले; जोगेश्वरीत डॉक्टरला अटक

Subscribe

जोगेश्वरी येथे राहणार्‍या एका २७ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून बदनामी झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बलात्कारी डॉक्टरला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. वंशराज शिवबहादूर द्विवेदी असे या ५८ वर्षीय डॉक्टरचे नाव असून तो सध्या जोगेश्वरीतील समर्थनगर, शिवदर्शन सहकारी सोसायटीमध्ये राहतो. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार १७ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार महिला ही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिचा प्रेमविवाह झाला असून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. विवाहापूर्वी ती तिच्या आई, दोन भावासोबत जोगेश्वरी परिसरात राहत होती. तिचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. अनेकदा उपचारासाठी ती डॉ. वंशराज द्विवेदी यांच्याकडे जात होती. मात्र लग्नानंतर त्यांच्याकडे जाणे तिने सोडून दिले होते. काही दिवसांपूर्वी त्याने तिला फोन करुन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यास तिच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होईल अशी धमकी दिली होती. मात्र तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता.

- Advertisement -

3 ऑक्टोबरला तिच्या पतीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ तिचा विवाहापूर्वी डॉ. वंशराज यांच्यासोबत शारीरिक संबंधचा होता. त्यामुळे तिच्या पतीला प्रचंड धक्का बसला होता. याबाबत त्याने तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. चार वर्षांपूर्वी ती मूळव्याधीच्या उपचारासाठी गेली होती. यावेळी त्याने तिला गुंगीचे इंजेशक्शन देऊन बेशुद्ध केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिचे काही अश्लील व्हिडिओ काढले होते. त्यानंतर तो तिला सतत ब्लॅकमेल करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. मात्र विवाहानंतर तिने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिचा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली होती.

या सर्व प्रकारानंतर पीडित मुलीने मेघवाडी पोलिसांत डॉ. वंशराज द्विवेदीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -