घरमुंबईअंधेरीतील पेनिन्सुला इमारतीच्या ६ व्या मजल्यावर आग

अंधेरीतील पेनिन्सुला इमारतीच्या ६ व्या मजल्यावर आग

Subscribe

अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडवर असलेल्या पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची ताजी घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अद्याप तीन जणांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोड येथील परिसर हा व्यावसायिक इमारतींसाठी ओळखला जात असून पेनिन्सुला हीदेखील एक २२ मजली व्यावसायिक इमारत आहे.

- Advertisement -

सोमवारी दुपारी अचानक इमारतीच्या ६ व्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ती १२ मजल्यापर्यंत पसरली. आगीच्या लोळासह धुरीचे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर परिसरात धावपळ सुरू झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -