घरमुंबईराज्यातील डॉक्टरांचा तुटवडा नव्या भरतीने भरून काढणार

राज्यातील डॉक्टरांचा तुटवडा नव्या भरतीने भरून काढणार

Subscribe

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर जाणवरी डॉक्टर्सची चणचण या भरतीमुळे दूर होईल.

राज्यात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णांची सतत गैरसोय होत असल्यामुळे डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने भरतीचा सकारात्मक निर्णय घेत डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास सुरूवात केली आहे. ही संख्या कमी असली तरी रूग्णांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. ”संपूर्ण राज्यात ८९० पदे भरली आहेत. अस्थायी स्वरूपात काम करणार्‍या एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांची पदे भरण्यात आली आहेत,” अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

डॉक्टर्सची भरती कायमस्वरूपी

राज्यातील आरोग्य केंद्र आणि त्यात रूग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांची संख्या आधीच व्यस्त होती. त्यामुळे सर्वच रूग्णांना आरोग्यसेवा मिळत नव्हती. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची अधिक चणचण जाणवत होती. त्यातून आरोग्य विभागाने डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यास सुरूवात केली आहे. ८९० डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत. ज्या भागात रस्त्याची सुविधासुद्धा नाही अशा भागातील रूग्णांना याचा फायदा होणार आहे. सध्या भरती केलेल्या डॉक्टरांना कायम स्वरूपी करण्यास सुरुवात झाली आहे. हे डॉक्टर अस्थायी प्रकारे सेवा करत होते. आता ते कायम झाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या इच्छेप्रमाणे भरती केली जात आहे. जेवढी रिक्त पदे आहेत. ती पदे भरण्यात येणार आहेत. या अस्थायी डॉक्टरांच्या मेरिटप्रमाणे त्यांची भरती केली जात आहे. डॉक्टरांची कायमस्वरुपी भरती केल्याने ते समाधानाने तिकडे काम करतील.
– डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालिका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -