घरमुंबईडोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ४३२ कारखान्यासाठी एकच अधिकारी

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ४३२ कारखान्यासाठी एकच अधिकारी

Subscribe

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ४३२ कारखान्यासाठी अवघा एकच अधिकारी असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे कारखान्यांचे ऑडीट केले जाते का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित हेात आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कारखान्यांना आग लागण्याचे तसेच स्फोट होण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत या घटनेत अनेक कामगारांना जीवही गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील ४३२ कारखान्यांचे निरीक्षणे आणि ऑडीट करण्यासाठी अवघा एकच अधिकारी असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे कारखान्यांचे ऑडीट केले जाते का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित हेात आहे.

५ अतिधोकादायक कारखाने

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात नोंदणीकृत कारखान्यांची संख्या एकूण ४३२ आहे. एवढ्या संख्येचा कारखान्यांची निरीक्षणे आणि ऑडीट एकच अधिकारी असून, त्याचा कार्यभार सु. सा. जोशी, उपसंचालक यांच्याकडे आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात एकूण ५ अतिधोकादायक कारखाने आहेत. समाजसेवक राजू नलावडे यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे. एमआयडीसीतील रासायिनक कंपन्यांमुळे इथल्या प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच कंपन्यांमध्ये अनेकवेळा आगी लागण्याचे आणि स्फोट होत असतात त्यात अनेकजण मृत्यूमुखी तर जखमी होत असतात. मात्र, त्यासंदर्भातची माहिती नलावडे यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कल्याण यांच्याकडे मागितली हेाती. मात्र, हि माहिती त्यांना देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

प्रोबेस कंपनीतील स्फोटात १२ जणांचा मृत्यू

प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ रोजी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात १२ जणांना जीव गमवावा लागला होता. तर २०० जण जखमी झाले होते. तर स्फोटात २ हजार ६६० मालमत्ता धारकांचे नुकसान झाले होते. प्रोबेस स्फोट चौकशी समितीचा अहवाल औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य यांचा कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सदर अहवाल औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय, मुख्य कार्यालय, मुंबई यांनी त्यांना यापूर्वीच दिला आहे. मात्र असे असताना त्यांचाच कल्याण कार्यालयाने अहवाल उपलब्ध नसल्याने त्यातील शिफारशी अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे याबाबत नलावडे यांनी आश्चर्य व्यक्त केल.

ही आहेत अतिधोकादायक कारखाने

ऑक्टल प्रोडक्ट लिमिटेड
गणेश पॉलीकेम लिमिटेड
घरडा केमिकल
मेट्रोपोलीटीयन एक्समीच लि
क्वॉलीटी इंडस्ट्रीज

- Advertisement -

हेही वाचा – ही कंपनी काश्मीरमध्ये कारखाना उघडणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -