घरमुंबईश्रीराम जोशी आज करणार प्लेटलेट्ल दानाची शतकपूर्ती

श्रीराम जोशी आज करणार प्लेटलेट्ल दानाची शतकपूर्ती

Subscribe

स्लग - लोकांसह डॉक्टरांमध्ये जागृती करण्याची गरज

रक्तदानाच्या तुलनेत प्लेटलेट्स दानाची जनजागृती कमी असल्याने आज अनेक रुग्णालयांमध्ये प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. तर काहींना त्याचा भुर्दंडही सोसावा लागतो.याचेच भान ठेवत गेल्या ४ वर्षात ९९ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. मंगळवारी याची शतकपूर्ती होणार असल्याचे पनवेलचे श्रीराम सचिंद्र जोशी यांनी सांगितले. प्लेटलेट्स दानाची प्रक्रिया बहुतांश डॉक्टरांना माहीतच नसल्याने त्यांच्यातही जनजागृती करण्याची गरज असल्याचे यावेळी जोशी यांनी सांगितले.

पनवेलमध्ये राहणारे श्रीराम जोशी यांनी त्यांचे वडील सचिंद्र जोशी यांचा प्लेटलेट्ल डोनरचा वारसा अविरतपणे सुरू ठेवला असून त्यांनी शतकपूर्तीकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी परळमधील केइएम रुग्णालयात त्यांचे प्लेटलेट्स दानाचे शतक पूर्ण होणार आहे. या वेळी त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यासोबत राहणार आहे. रक्तदान हे जगातील कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचं काम करते. पण तरीही रक्तातून जे प्लेटलेट्स दान करण्याचं काम असतं त्याबद्दल अजूनही लोकांमध्ये गैरसमज आणि उदासीनता मोठ्या प्रमाणात जाणवते. डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने आजतागायत अनेक रुग्ण दगावले आहेत. वेळेवर रुग्णाला प्लेटलेट्स न मिळाल्याने त्याचा मृत्यू होत असल्याने प्लेटलेट्सला खूप महत्त्व आहे. कित्येक वेळा तरी गरजू पेशंटला प्लेटलेट्स मिळत नाहीत आणि मग प्लेटलेट्सचा पुरवठा झाला नाही म्हणून त्यांचा जीवसुद्धा जातो. अशाच किती तरी गरजू पेशंटसाठी अगदी नवसंजीवक ठरलेले पनवेलचे श्रीराम सचिंद्र जोशी.

- Advertisement -

आतापर्यंत एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 99 वेळा रक्तदान करून श्रीराम जोशींनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवलाय. मंगळवारी याचे शतक पूर्ण होत असल्याने त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण आहे.१९९२ मध्ये श्रीराम जोशी यांचे वडील सचिंद्र जोशी यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून गरजू पेशंट्सना प्लेटलेट्स दान करण्याचा संकल्प केला.जवळजवळ वयाच्या 70 वर्षांपर्यंत सचिंद्र जोशी यांनी ४० वेळा वेळोवेळी गरजू पेशंट्सना प्लेटलेट्स देऊन त्यांच्या आयुष्यात जीवनरंग भरून अनेकांचे प्राण वाचविण्याचे व्रत पाळले. पण आता त्यांच्या उतारवयामुळे प्लेटलेट्स दान करणे शक्य होत नसल्यानं त्यांचा हा वारसा त्यांचा मुलगा श्रीराम जोशी यांनी अविरतपणे सुरू ठेवला.

अनेक जवान स्वतःचे रक्त सांडून मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत राहतात, पण पनवेलमधले श्रीराम जोशी हे देशातील गरजू पेशंट्सना रक्तातील प्लेटलेट्स दान करून अनेकांचे प्राण वाचवतात. म्हणूनच श्रीराम जोशी यांना प्लेटलेट्स दान करणारे योद्धाच म्हणावं लागेल. आतापर्यंत त्यांनी खारघरमधले टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, परेलमधले केईएम हॉस्पिटलसारख्या अनेक बड्या हॉस्पिटलमध्ये प्लेटलेट्स दान केले आहेत.

- Advertisement -

प्लेटलेट्स दानाच्या या समाजसेवेबद्दल श्रीराम यांना मॅरो डोनर रजिस्ट्रीकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. तर केईएम हॉस्पिटलमधल्या अनेक रूग्णांना प्लेटलेट्स दान केल्याबद्दल केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रक्तदानाप्रमाणे प्लेटलेट्स दान हेसुद्धा महत्त्वाचे असून याची खूप कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे आजमितीला रुग्णालयात प्लेटलेट्सची कमतरता भासते.अनेक डॉक्टरांनाही याची कल्पना नसल्याने त्यांनीही प्लेटलेट्स दान कसे होते, याची माहिती करून घ्यायला हवी. माझ्या वडिलांनी ४० वेळा प्लेटलेट्स दान केल्यानंतर त्यांचा वारसा पुढे मी चालवण्याचा संकल्प केला. त्यानुसार मी आतापर्यंत ९९ वेळा प्लेटलेट्स दान केले. मंगळवारी मी शतकपूर्ती करणार आहे.
-श्रीराम सचिंद्र जोशी, प्लेटलेट्स दाता ,पनवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -