घरमुंबईअण्णांच्या जीवाशी खेळू नका - उध्दव ठाकरे

अण्णांच्या जीवाशी खेळू नका – उध्दव ठाकरे

Subscribe

अण्णांच्या प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये ३० तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे तरी देखील अद्याप सरकारकडून दखल घेतली गेली नाही. अण्णांच्या प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे. अशा परीस्थितीत अण्णांच्या उपोषणाला शुभेच्छा देणारे पत्र पंतप्रधानांनी पाठवल्याने संतापही व्यक्तं केला आहे. अण्णांचे प्राण महत्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे कळकळीचे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

uddhav thackeray letter
उध्दव ठाकरेंचे पत्र

प्राणत्यागापेक्षा रस्त्यावर उतरावे

अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे सांगितले आहे. यावर उध्दव ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी अण्णांच्या आमरण उपोषणाला शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक, तितकाच हास्यास्पद असल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे. अण्णांचा लढा भ्रष्टाचारविरोधी आहे आणि देशाचीच ती समस्या आहे. पण आमरण उपोषण करुन प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा आणि देशाला जाग आणावी, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

शिवसेना अण्णांसोबत

सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्विकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले आणि त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरु दिले. देशाची गंगा शुध्द करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे आणि लढा उभारावा, असं उध्दव ठाकरेंनी सांगितले आहे. शिवसेना अण्णांच्यासोबत आहे. जेथे शक्य आहे तिथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; गिरीष महाजन आज घेणार भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -