घरमहाराष्ट्रअण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; गिरीश महाजन आज घेणार भेट

अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; गिरीश महाजन आज घेणार भेट

Subscribe

अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून उपोषणाची दखल घेतली गेली नाही. अण्णांची प्रकृती ढासळत चालल्यामुळे गावकरी चिंतेत आले आहेत.

देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अण्णांच्या यकृतामध्ये संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढचे २४ तास चिंतेचे आहेत. अण्णांची तब्बेत ढासळली असून त्यांचे वजन ३.५ किलोने कमी झाले आहे. जर अण्णांची तब्बेत आणखी बिघडली तर त्यांना ताबडतोबत रुग्णालयात दाखल करावे लागेल असे सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. सरकारकडून अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ अहमदनगर महामार्गावर कालपासून रास्तारोको आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज मंत्री गिरीश महाजन अण्णांची भेट घेणार आहेत.

आजही पारनेर बंद

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतक-यांच्या शेतीमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा या सहीत अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी सकाळी राळेगणसिध्दी येथील यादवबाबा मंदिरासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून उपोषणाची दखल घेतली गेली नाही. अण्णांची प्रकृती ढासळत चालल्यामुळे गावकरी चिंतेत आले आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारपासून पारनेर बंदीची हाक दिली आहे. तर आज देखील ग्रामस्थ अहमदनगर महामार्गावर रास्तारोको करणार आहेत. तर सोमवारी सामुहिक आत्महदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

गिरिश महाजन घेणार भेट

सरकारला मागण्यांसंदर्भात आजवर अण्णा हजारे यांनी ३५ पत्र पाठवली. फक्त राज्य सरकारचं नाही, तर केंद्र सरकार आणि थेट पंतप्रधानांना देखील अण्णा हजारांनी पत्र पाठवली. मात्र, या पत्रांना समाधानकारक प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अण्णांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. हे उत्तर वाचून अनेकांना हसावं की रडावं? हाच प्रश्न पडला असावा. ‘आपका जनवरी १, २०१९ का पत्र प्राप्त हुआ, शुभकामनाओं सहित’, इतक्याच मजकुराचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातून अण्णांना देण्यात आलं आहे. दरम्यान, आज सरकारकडून मंत्री गिरिष महाजन अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिध्दी येथे येणार आहेत. अण्णा उपोषणाला बसण्याआधी गिरिश महाजन यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र अण्णांनी भेटीला नकार दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -