घरमुंबईभारतीय दंत परिषदेच्या सदस्यपदी डॉ. अशोक ढोबळे

भारतीय दंत परिषदेच्या सदस्यपदी डॉ. अशोक ढोबळे

Subscribe

डॉ. ढोबळे हे ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डेंटीस्टस’चे फेलो असून कॉमनवेल्थ डेंटल असोसिएशनचे कार्यकारी सचिवही आहेत. 

महाराष्ट्र राज्य दंत परिषद अर्थात स्टेट डेंटल कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने भारतीय दंत परिषदेच्या (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) सदस्यत्वासाठी नुकत्याच निवडणुका घेतल्या होत्या. या निवडणुकीत डॉ. अशोक दिगंबरराव ढोबळे यांची महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. व्यवसायाने ऑथोडेंटीस्ट असलेले डॉ. अशोक ढोबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांमध्ये सल्लागार म्हणून पूर्वी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या डॉ. ढोबळे  इंडियन डेंटल असोसिएशनचे मानद सरचिटणीस आहेत. त्यांनी मौखिक आरोग्याच्या क्षेत्रात जे योगदान दिले त्याची दखल घेत एफडीआय वर्ल्ड डेंटल फेडरेशन, जिनिव्हाने त्यांची नियुक्ती त्यांच्या कार्यकारी परिषदेवर केली आहे. परिषदेचे सदस्य म्हणून ते २०१४ पासून कार्यरत आहेत. ते ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ डेंटीस्टस’चे फेलो असून कॉमनवेल्थ डेंटल असोसिएशनचे कार्यकारी सचिवही आहेत.


वाचा : धक्कादायक! छेडछाड केली म्हणून कापले ‘लिंग’

आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ ढोबळे यांनी यावेळी सांगितलं, ‘आयडीएने जे विविध उपक्रम मौखिक आरोग्याच्या क्षेत्रात राबवले आहेत, ते मौखिक आरोग्यनिगा क्षेत्रात नवीन सुरुवात करणार आहेत. त्यातून २०२२ पर्यंत देशात मौखिक आरोग्याचा प्रसार होणार आहे.’ इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) ही भारतातील दंतशल्यचिकित्सकांची एक सर्वात मोठी मान्यताप्राप्त संघटना आहे. २९ राज्यं आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ती कार्यरत असून तिच्या देशभर पसरलेल्या ४६० हूनही अधिक शाखा आहेत. देशाला कमाल मौखिक आरोग्याच्या मार्गावर नेण्याचे आणि त्यासाठी स्वतःच्या सदस्यांमध्ये व्यावसायिक सुधारणांना उभारी देण्याचे उद्दिष्ट त्या माध्यमातून संस्थेला साध्य करायचे आहे. मौखिक आरोग्याच्या बाबतीत आयडीए फार जागरूक असते आणि २०२२ पर्यंत दरवर्षी कमाल मौखिक आरोग्य प्रत्येक भारतीयांमध्ये आणावे, यासाठी ती कार्य करते. त्यातून राष्ट्रीय आरोग्य निर्देशांक सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -