घरदेश-विदेशजेव्हा कामगार जीवनासाठी संघर्ष करत होते तेव्हा पंतप्रधान फोटो काढत होते -...

जेव्हा कामगार जीवनासाठी संघर्ष करत होते तेव्हा पंतप्रधान फोटो काढत होते – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. नुकतेच पंतप्रधान मोदींनी ब्रम्हपूत्रा नदीवर बांधलेल्या पूलाचे उदघाटन केले होते. मात्र मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मुलांना अजूनही वाचवण्यात यश न आल्यामुळे राहुल गाधींनी ही टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नवीन पुलावर फोटो खेचण्या ऐवजी मेघालय येथे अडकलेल्या १५ अल्पवयीन मुलांवर लक्ष देण्याचा सल्ला गांधींनी ट्विटरवरून मोदींना दिला आहे. मेघालच्या एका कोळसा खाणीत पाणी भरल्यामुळे १५ मुले अडकली होती. ही मुले बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोन आठवडे झाले यांच्या पर्यंत मदत पोहचली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आसाम राज्यातील डिब्रूगढ जिल्ह्यातील ब्रम्हपूत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या पूलाचे उदघाटन केले होते. यादरम्यान उदघाटना दरम्यान काढलेले फोटो सोशलमीडियावर टाकण्यात आले होते.

काय म्हणाले राहुल गांधी 

“१५ अल्पवयीन मुले मागील दोन आठवड्यापासून कोळश्याच्या खाणीत अडकले आहेत. ते अन्न आणि हवेसाठी संघर्ष करतात आहे. याच वेळी पंतप्रधान बोगिबेल पूलावरील कॅमेऱ्यांसाठी पोज देत आहेत. मोदी सरकार या मुलांना वाचवण्यासााठी उच्च दाबाचे पंप वापरत नाही. पंतप्रधान तुम्ही कृपया त्या लहान मुलांचे प्रा्ण वाचवा.” – राहुल गांधी

- Advertisement -

काय आहे घटना

मेघालय राज्यात एका कोळश्याच्या खाणीत १५ कामगार अडकले होते. कोळसा खानीत पाणी साचल्यामुळे हे कामगार खाणीत अडकले आहेत. या कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. कोळसा खाणीत साचलेले पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र अजूनही या मुलांना वाचवण्यात यश आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -