घरमुंबईडॉ.पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपींना जामीन

डॉ.पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपींना जामीन

Subscribe

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन महिला डॉक्टकांना मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयानं त्यांची जामीनावर सुटका केली आहे. पण त्यांना मुंबईबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नायर हॉस्पिटलमध्ये २२ मे रोजी डॉ. पायल तडवी हिने तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली. याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

२३ जूलैला न्यायालयाने जामीन आर्जावरील सुनावणी २५ जूलैपर्यंत तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ३० जूलैला न्यायालयाने सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. आणि आज अखेर जामीनावर सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपीना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर त्यांना या आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच दोन दिवसाआड न्यायालयासमोर हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.आरोपी डॉक्टरांना नायर रुग्णालय किंवा आग्रीपाडामध्ये जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

आरोपी डॉक्टरांनी नष्ट केली सुसाईड नोट?

पोलिसांना पायलच्या मोबाईलमध्ये तिच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या नोटचे फोटो पायलनं मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. त्यामुळे आरोपी महिला डॉक्टरांनीच पायलने लिहिलेली सुसाईड नोट नष्ट केली असण्याच्या दाव्याला बळ मिळालं आहे. या सुसाईड नोटमध्ये पायलनं तिघा महिला डॉक्टरांच्या त्रासाबद्दल सर्वकाही लिहिलं आहे. ‘या तिघींनी विभागातील ए. एच. ओ. विभागप्रमुख आणि प्राचार्य यांच्यासमोर आमची चुकीची प्रतिमा तयार केली होती. अनेक वेळा मॅडमकडे पुढे येऊन तक्रार करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मला यातून कुठलाही मार्ग दिसत नाही, दिसतोय तो फक्त शेवट’ अशा भावनिक आणि निर्वाणीच्या शब्दांमध्ये पायलनं आपली व्यथा या नोटमध्ये लिहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -