घरमुंबईबदललेल्या पेपर पॅटर्नमुळे दहावीचे विद्यार्थी चिंतेत

बदललेल्या पेपर पॅटर्नमुळे दहावीचे विद्यार्थी चिंतेत

Subscribe

दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा यासाठी बालभारतीने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून दिले असले तरी यावर्षी बदललेला अभ्यासक्रम, 100 मार्कांचा पेपर व नवा पेपर पॅटर्न यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बदलता अभ्यासक्रम, नवा पेपर पॅटर्न यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पेपर कसा असेल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई विभागातून यावर्षी तीन लाख 83 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 999 परीक्षा केंद्रावर या परीक्षा होणार आहेत.

मुंबई विभागातून यावर्षी तीन लाख 83 हजार 320 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून एक लाख 21 हजार 441, पालघर जिल्ह्यातून 67 हजार 762, रायगडमधून 39 हजार 434, तर मुंबईच्या तीन विभागातून 1 लाख 54 हजार 683 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक विद्यार्थी पश्चिम मुंबईमधून 67 हजार 284 परीक्षेला बसले आहेत. त्या खालोखाल मुंबई उत्तर भागातून 52 हजार 247 व दक्षिण मुंबईतून 35 हजार 152 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मात्र यावर्षी दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच पेपर पॅटर्नही बदलण्यात आला आहे. त्यामुळे पेपर कसा असेल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

बालभारतीकडून विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले असले तरी अभ्यासक्रम व पेपर पॅटर्न दोन्ही एकाच वेळी बदलण्यात आले आहेत. तसेच काही वर्षांपासून 80 मार्कांची लेखी व 20 मार्कांची तोंडी हे परीक्षेचे स्वरुप बदलून मराठी, हिंदी, इंग्रजी, सोशल सायन्सचे पेपर 100 मार्कांचे घेण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम, पेपरचे स्वरुप, मार्कांचे पॅटर्न असे अनेक बदल यावर्षी केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई विभागातून 999 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. त्यासाठी 999 केंद्र संचालकांबरोबर 75 परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा                   विद्यार्थी
ठाणे                   1,21,441
पालघर                 67,762,
रायगड                 39,434
मुंबई पश्चिम           67,284
मुंबई उत्तर             52,247
मुंबई दक्षिण           35,152

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -