घरमनोरंजनटिटवाळ्याचा रेनबोवाला

टिटवाळ्याचा रेनबोवाला

Subscribe

स्पर्धा नाटकाची असो किंवा एकांकिकेची असो, यात हमखास पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पुणे, मुंबईतील नाटकांचा समावेश असायचा. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने अलिबाग इथे सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या एकांकिकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या निवडलेल्या एकांकिकांमध्ये मुंबईतल्या कोणत्याही एकांकिकेचा समावेश नव्हता. एकंदरीत काय तर ही एकांकिका चळवळ इतरही जिल्ह्यात झपाट्याने वाढताना दिसते आहे. टिटवाळा म्हणजे गणपतीचे तीर्थस्थान अशी काहीशी या गावाची ओळख होती. पण आता इथेही सांस्कृतिक घडामोडी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. गंधर्व कलाधारा ही टिटवाळ्यातली एक नाट्यसंस्था. ज्या संस्थेने रेनबोवाला ही एकांकिका सादर करून अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. पारंगत सन्मान हा मानाचा पुरस्कार या एकांकिकेला प्राप्त झालेला आहे.

अस्तित्त्व ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या एकांकिकांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना पारंगत सन्मान पुरस्कार देऊन गौरवित असते. यंदा रेनबोवाला बरोबर औरंगाबादच्या मादी या एकांकिकेचा सन्मान करण्यात आलेला आहे. देव हरवला आहे, लाली या एकांकिकांना विशेष परीक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. स्वप्निल टकले, राजेश आंगुडे, सायली बांदकर, मोनिका बनकर, राहुल बेलापूरकर, कृष्णा वाळके, शाम चव्हाण, निनाद म्हैसाळकर, प्रियंका पवार, तृप्ती गायकवाड, कोमल वंजारे, ज्ञानदा खोत या विशेष गुणवत्ता दाखवणार्‍या कलाकारांचासुद्धा सन्मान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -