घरमुंबईकोरोना काळात शाळाबाह्य ठरणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पालिका सरसावली

कोरोना काळात शाळाबाह्य ठरणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पालिका सरसावली

Subscribe

कोरोनामुळे काही पालक आपल्या मूळ गावी गेले, तर काही पालकांकडे मोबाईल नसल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल २५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे काही पालक आपल्या मूळ गावी गेले, तर काही पालकांकडे मोबाईल नसल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल २५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये २ लाख ८३ हजार ८७६ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ६३६ विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विद्यार्थीनिहाय माहिती जमा करण्यापासून बालकमित्र, पालकमित्र, स्थानिक समाजसेवक यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणापासून मुंबई महापालिकेच्या शाळांमधील २५ टक्के विद्यार्थी वंचित आहेत. यामध्ये पालक मूळ गावी गेल्याने विद्यार्थ्यांशी संपर्क तुटला आहे. तर काही पालकांकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल नाही, मोबाईल आहे पण नेट पॅक भरण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक शाळेमध्ये नाहीत. यामुळे पालिकेतील जवळपास २५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये २ लाख ८३ हजार ८७६ विद्यार्थी आहेत. त्यातील २५ हजार ६३६ विद्यार्थी हे स्थलांतरित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांची सद्यस्थिती मिळवण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वर्गनिहाय समिती, मुख्याध्यापक, पालिका अधिकारी, स्थानिक समाजसेवक यांची समिती नेमण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. वर्गनिहाय समितीमध्ये वर्गातील दोन कार्यशील पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्वयंसेवी संस्था, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक यांचा समावेश असणार आहे. वर्गनिहाय असलेल्या या समित्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येणार असून, यावर वर्गातील संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पालकांकडून किंवा अन्य सदस्यांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात येणार्‍या समस्यांची माहिती देण्यात येईल. वर्ग समितीतील सदस्य व मुख्याध्यापक, पालिका अधिकारी, स्थानिक समाजसेवक यांच्या सहभागाने स्थापन करण्यात येणार्‍या इमारत समितीकडून संपर्कात नसणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करावे, यामध्ये पालकमित्र व बालकमित्र यासारख्या संकल्पना राबवण्यात याव्यात अशा सूचना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -