घरमुंबईएचडीआयएल आणि पीएमसी बँक कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल

एचडीआयएल आणि पीएमसी बँक कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल

Subscribe

४ हजार ३३५ कोटींचा हा घोटाळा असल्याचे समोर आले आहे. बनावट खात्यांवर हा पैसा वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या आदेशाने एचडीआयएलसह बँकेच्या दहा पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ४ हजार ३३५ कोटींचा हा घोटाळा असल्याचे समोर आले आहे. बनावट खात्यांवर हा पैसा वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

असा उघडकीस आला घोटाळा

पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकारी यांच्या विरोधात मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००८ ते २०१९ या कालावधीत बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसल्याची माहिती आरबीआयपासून लपवून ठेवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. परिणामी बँकेला ४ हजार ३३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या पैशांमधून गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या गैरव्यवहारात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा हातभार होता, अशीही माहिती पुढे येत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःसाठी केला. त्यामुळे कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४७१, १२० (ब) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -