घरमुंबईसुरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; सोमवारी होणार चौकशी

सुरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; सोमवारी होणार चौकशी

Subscribe

मुंबई : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी नुकतीच चौकशी झालेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सोमवीर त्यांची चौकशी होणार आहे. सुरज चव्हाण यांचा मोबाईल ईडीने जप्त केला आहे. चॅटमधून ईडीला महत्वाची माहिती मिळली असल्याचे समजते. (ED summons to Suraj Chavan The inquiry will be held on Monday

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकणी बुधवारी सुरज चव्हाण यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. सुरज चव्हाण यांची गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर रात्री उशीरा सुरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

1 जुलैच्या मोर्चासाठी सत्ताधाऱ्यांनाही निमंत्रण

1 जुलै 2023 रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे निमंत्रण सत्ताधाऱ्यांना देण्यात येणार आहे. कारण भाजप आमदारांनीही पालिकेतील भ्रष्टाचाराचे पत्र दिले होते. पण त्यांची तोंड बंद करण्यात आली आहेत, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. या मोर्च्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पालिकेतील भ्रष्टाराचाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे व त्याचे नेतृत्त्व आदित्य ठाकरे करतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे कोणत्या सत्ताधारी आमदारांना मोर्चाचे निमंत्रण देणार व त्यांचे निमंत्रण स्विकारून कोणते कोणते आमदार मोर्चात सहभागी होणार याची चर्चा सुरु झाली. १ जुलैच्या मोर्चाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना निमंत्रण दिले जाणार का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या मोर्चाचे निमंत्रण दिले जाणार आहे. मी सत्ताधाऱ्यांनाही या मोर्चाचे निमंत्रण देणार आहे. कारण काही भाजप आमदारांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचे पत्र दिले होते. त्यामुळे त्यांनाही मोर्चाचे निमंत्रण दिले जाणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

काय आहे घोटाळा?

कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राटे काढण्यात आली. राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि भागीदारांची एक कंपनी होती. डॉक्टर हेमंत गुप्ता, संजय शाह, राजू साळुंखेही भागीदार आहेत. लाईफलाईन म‌ॅनेजमेंट सर्व्हिसला कुठलाही अनुभव नसताना कंत्राटे देण्यात आली. हे कंत्राट वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे होते. यात कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. बीएसमीला सादर केलेला पार्टनरशिप डिडही खोटे असल्याचे बोलले जात आहे. पुरेसा स्टाफ नसल्याने इंटर्न डॉक्टरांनाही नेमल्याचे उघड झाले आहे. एकूण 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

फडणवीसांनीच सांगितलं काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?

कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. पुण्यात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. कोविड काळात अनेक खोट्या कंपन्या उभारण्यात आल्या. त्यात अनुभव नसलेल्यांना कंत्राट देण्यात आली. त्याबाबत चौकशी सुरु होती. आता ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, छाप्यात काय सापडलं हे ईडीचं सांगू शकते, मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -