घरमुंबईनवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ; मंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली

नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ; मंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली

Subscribe

पाणी, स्वच्छता, पोषणमुल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एचएमआयएस (HMIS) अहवालानूसार ही आकडेवारी समोर आली असून मागच्या वर्षी एकूण १६ हजार ५३९ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

HMIS च्या अहवालानुसार मागच्या तीन वर्षांचा मृत्यूदर

२०१६-१७ मध्ये १०३४८ बालकांचा मृत्यू

- Advertisement -

२०१७-१८ मध्ये १३०५९ बालकांचा मृत्यू

२०१८-१९ मध्ये १६५३९ बालकांचा मृत्यू

- Advertisement -

या कारणामुळे मृत्यूंमध्ये वाढ

राज्यभरात वाढलेले बालमृत्यू हे इन्क्युबेटर, व्हेंटीलेटरसह वैद्यकीय सुविधा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे झालेले नाहीत, असे लेखी उत्तरात म्हटले आहे. तर बालमृत्यूंना जंतुसंसर्ग, न्युमोनिया, जन्मतः कमी वजन, जन्मताः श्वासावरोध या कारणांमुळे मृत्यू होत असल्याचे लेखी उत्तरात सांगितले गेले आहे.

अर्भक मृत्यूदर १० वर आणण्याचा प्रयत्न

शाश्वत विकास उद्दिष्टे SDG (Sustainable Development Goal) अंतर्गत २०१३ ते २०३० पर्यंत महाराष्ट्राद्वारे राज्यातील अर्भकमृत्यू दर १० (दर १००० जन्म) पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. २०१४ साली हा मृत्यूदर २२ एवढा होता. सध्या तो १९ पर्यंत खाली आलेला आहे.

हेही वाचा- 

ठाणे पालिका रुग्णालयाचा निष्काळजीपणा; जमिनीवर पडून अर्भकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -