घरदेश-विदेशभारतात पहिल्यांदाच फिरते 'पोटविकार केंद्र'; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

भारतात पहिल्यांदाच फिरते ‘पोटविकार केंद्र’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

Subscribe

भारतात पहिल्यांदाच फिरते 'पोटविकार केंद्र सुरु होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

दुर्गम भागात राहणाऱ्या तसेच हॉस्पिटलपर्यंत पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी भारतातील पहिलेच फिरते पोटविकार केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्याचा फायदा पोट विकार असणाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरते पोट विकार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण दुर्गम भागातील गरीब, गरजू रुग्णांना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र राज्य सरकार आणि बलदोटा इन्स्टट्यिूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.

व्हॅनमध्ये या सुविधा मिळणार

या फिरत्या केंद्रात अद्ययावत ऑपरेशन थिएटर असून दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन उपस्थित राहणार आहेत. एच पायलोरी, कॅन्सरचे लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचे निदान, अॅसिडिटीची तपासणी या केंद्रात होणार आहे. वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार असल्याचे डॉ. अमित मायदेव यांनी सांगितले.

- Advertisement -

मोफत मिळणार सेवा

ही सुविधा चालू करण्यासाठी नरेंद्र कुमार बलदोटा आणि परिवार यांनी पुढाकार घेतला आहे. या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय, उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास गाडीवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे.


हेही वाचा – नगरसेवकांच्या विकासकामांसाठी डिजिटल जाहिरातींचे फलक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -