घरदेश-विदेशबीएचयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले; प्राध्यापक फिरोज खान यांनी दिला राजीनामा

बीएचयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले; प्राध्यापक फिरोज खान यांनी दिला राजीनामा

Subscribe

गेल्या महिन्यांपासून सुरू असलेल्या बीएचयूच्या विद्यार्थ्यांचे अखेर आंदोलन संपले.

ज्याप्रमाणे हिंदूना मदरशांमध्ये शिकवण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे मुस्लीम प्राध्यापकाकडून आम्ही संस्कृत शिकून घेणार नाही, असा ठाम विरोध बनारस हिंदु युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापक असणारे डॉ. फिरोज खान यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून राजीनामा दिला आहे. अखेर महिन्याभरापासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले आहे.

गेल्या महिन्यात डॉ. फिरोज खान यांच्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती. मात्र युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी या नेमणूकबद्दल निषेध व्यक्त केला. प्राध्यापक फिरोज खान यांची त्वरित बदली करण्याची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबिवण्यास नकार दिला होता.

- Advertisement -

या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे मत स्पष्ट केले की, त्यांचा मुस्लिम शिक्षकांच्या नेमणुकीला विरोधात नसून धर्माशी संबंधित असलेल्या एखाद्या विषयाला हिंदू नसलेल्या प्राध्यापकाच्या नेमणुकीला विरोध आहे.

- Advertisement -

जेव्हा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते तेव्हा डॉ. फिरोज खान यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहिले होते. २९ नोव्हेंबर रोजी त्यांची पहिली आयुर्वेद विभागासाठी मुलाखत घेण्यात आली होती, तर दुसरी कला संकाय संस्कृत विभागासाठी ४ डिसेंबरला मुलाखत झाली होती.

डॉ. फिरोज खान यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कला शाखेत संस्कृत विभागात त्यांची नेमणूक झाल्यानंतर १० डिसेंबरला त्यांनी एसव्हीडीव्हीचा राजीनामा दिला.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार प्रकरण; १६ डिसेंबरला पुढील सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -