घरमुंबईक्रेडिट-डेबिट कार्ड सांभाळा! क्लोनिंग करून केली जातेय फसवणूक!

क्रेडिट-डेबिट कार्ड सांभाळा! क्लोनिंग करून केली जातेय फसवणूक!

Subscribe

कार्ड क्लोनिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या एका वॉण्टेड इस्टेट एजंट आरोपीला गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आतापर्यंत विविध शहरांत स्वाईप मशिनचा दुरुपयोग करुन विविध बँकांसह देश-विदेशातील खातेदारांची सुमारे सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

विदेशातील खातेदारांच्या क्रेडिट आणि डेबीट कार्डची माहिती प्राप्त करून कार्ड क्लोनिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या एका वॉण्टेड इस्टेट एजंट आरोपीला गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मेहमूद इब्राहिम लांबे असे या आरोपी एजंटचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यात त्याला येथील लोकल कोर्टाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी या इस्टेट एजंटने बोगस नावाने दुकान थाटले होते. तसेच त्याने बँकेत खाते उघडून स्वाईप मशिन मिळवली होती. त्याद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी सहा आरोपी अटकेत असून त्यांच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सहा कोटी रुपयांची फसवणूक

या टोळीने आतापर्यंत विविध शहरांत स्वाईप मशिनचा दुरुपयोग करुन विविध बँकांसह देश-विदेशातील खातेदारांची सुमारे सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मालवणीत कार्ड क्लोनिंगद्वारे विविध बँकेसह खातेदारांची फसवणूक करणारी एक टोळी मालवणी परिसरात कार्यरत असल्याची माहिती मिळताच प्रॉपटी सेलच्या अधिकाऱ्यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच मालवणी, अंधेरी आणि मिरारोड परिसरातून या टोळीशी संबंधित प्रताप जोगिंदर राय, मोहम्मद हसन इक्बाल शेख, मुकेश राजू शर्मा, जुबेर निसार सय्यद, फईम बशीर शोरा, अबूबकर मोहम्मद साब शेख या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ५१ स्वाईप मशिन, दोन लॅपटॉप क्लोनिंगद्वारे तयार ५१ बोगस डेबीट, क्रेडिट कार्ड, कार्ड बनविण्यासाठी लागणारे कार्ड रिडर, रायडर आणि अनेक बँकांचे धनादेश जप्त केले होते.

- Advertisement -

असे करायचे फसवणूक

चौकशीत ही टोळी बोगस कागदपत्रे सादर बँकेतून दुकानाच्या नावाने स्वाईप मशिन घेऊन ही फसवणूक करीत होते. त्यासाठी काही दुकानदारांना मोठ्या कमिशनचे आमिष दाखवून त्यांचा वापर केला जात होता. या गुन्ह्यांत मेहमूद लांबे याचा सहभाग उघडकीस येताच त्याला सोमवारी मालवणीतून पोलिसांनी अटक केली. तो इस्टेट एजंट असून त्याने मालवणीत इंडियन आर्ट गॅलरी नावाचे एक दुकान असल्याचे भासवून तसेच बोगस बँक खाते उघडून स्वाईप मशिन प्राप्त केले होते. त्याचा त्याने मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

देशभरात सक्रिय

ही टोळी केवळ मुंबईत नव्हे तर देशभरातील विविध शहरात सक्रिय होती. आतापर्यंत त्यांनी पाच ते सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. भारतातील खातेदारासह विदेशातील काही खातेदारांच्या आंतरराष्ट्रीय कार्डचाही त्यांनी गैरवापर केला आहे. आंतरराष्ट्रीय कार्डचा डाटा प्राप्त करून तो बनावट क्रेडिट कार्डवर राईट करून त्याचा वापर करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. कार्ड क्लोनिंगसाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय डेबीट आणि क्रेडिट कार्डचा डेटा वापरला असून तो त्यांनी कोणाकडून घेतला, या टोळीच्या गैरव्यवहाराचे जाळे संपूर्ण भारतात परसले असून त्याचे इतर काही साथीदार आहेत का याचा शोध सुरू आहे. तसेच पॉईंट ऑफ सेल मशिन पुरविणाऱ्या व्यक्तीचाही पोलीस शोध घेत आहेत. इतर सहाही आरोपींच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -