घरमुंबईइस्थर अन्हुया बलात्कार-हत्या प्रकरण: चंद्रभान सानपची शिक्षा कायम

इस्थर अन्हुया बलात्कार-हत्या प्रकरण: चंद्रभान सानपची शिक्षा कायम

Subscribe

'आरोपीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही, तो सुधारण्याची शक्यता नाही' तसंच अशा माणसाचे समाजात राहणे धोकादायक असल्याचे सांगत कोर्टाने चंद्रभान सानपची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

२०१४ च्या इस्थर अन्हुया बलात्कार आणि हत्या प्रकरणाताली आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आज मुंबई हायकोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात आरोपी चंद्रभान सानपने कोर्टात अपील केले होते. या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्याचे अपील फेटाळून लावत त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. ‘आरोपीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही, तो सुधारण्याची शक्यता नाही’ तसंच अशा माणसाचे समाजात राहणे धोकादायक असल्याचे सांगत कोर्टाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे.

- Advertisement -

चंद्रभान सानपची फाशी कायम

आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. या खंडपीठाने याप्रकरणाचा अंतिम निकाल सांगितला. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाप नाही त्यामुळे अशी व्यक्ती समाजात राहणे धोक्याचे असल्याचे सांगत चंद्रभान सानप यांची शिक्षा कोर्टाने कायम ठेवली आहे. आरोपी चंद्रभानने इस्थर अन्हुया हिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

काय आहे नेमकं प्रकरण

आंध्र प्रदेशमध्ये राहणारी इस्थर अनुह्या मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध्र प्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर ५ जानेवारी २०१४ ला मुंबईत आली. रेल्वेने ती मुंबईत आली आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला ती पहाटेच्या सुमारास रेल्वेमधून उतरली. आपण टॅक्सीचालक असल्याचे भासवून ‘तुला तुझ्या घरी सोडतो’ असे चंद्रभानने इस्थरला सांगून तिला दुचाकीवर अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेले. हे लक्षात येताच इस्थरने गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र सानपने इस्थरला ईस्टर्न एक्स्प्रेसवर भांडुप परिसरातील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. तिच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली. विशेष महिला कोर्टाने हा प्रकार क्रूर तसेच अमानवी असल्याचे म्हणत सानपला फाशीची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -