घरमुंबईएस्टिमेट अडीच लाखांचं बिल लावलं ७ लाखांचं; फोर्टिस हॉस्पिटलचा प्रकार

एस्टिमेट अडीच लाखांचं बिल लावलं ७ लाखांचं; फोर्टिस हॉस्पिटलचा प्रकार

Subscribe

एस्टिमेटपेक्षा चारपट वाढीव बिल देऊन रुग्णांची लूट करणाऱ्या वाशीच्या हिरानंदानी फोर्टिस रुग्णालयाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच दणका दिला आहे.

एस्टिमेटपेक्षा चारपट वाढीव बिल देऊन रुग्णांची लूट करणाऱ्या वाशीच्या हिरानंदानी फोर्टिस रुग्णालयाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच दणका दिला आहे. वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात ७ लाखांच्या बिलासाठी बाळ गमावलेल्या डेंग्यूग्रस्त महिलेला औषधाशिवाय ३ दिवस अडवून ठेवण्यात आले होते.

हॉस्पिटलकडून लावण्यात आलं भरमसाठ बिल 

मिनाक्षी शेलार या ३६ वर्षीय गरोदर महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने २० सप्टेंबर या दिवशी कळंबोली येथील एम.जी.एम. रुग्णालयामध्ये दाखल केले होते. पण, त्यानंतर ३ दिवसांनी त्यांना कामोठेतील एम.जी.एम. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण, ९ महिन्यांची गरोदर असल्याने या महिलेला पुढील उपचारांसाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल केले गेले. त्यानंतर, फोर्टिस रुग्णालय प्रशासनाने महिलेचे पती प्रवीण शेलार यांना सुरुवातीला १० दिवसांसाठी २ लाख ६१ हजार इतक्या रकमेचे एस्टिमेट दिले आणि या महिलेचे ३ लाख ५० हजार इतकं मेडिक्लेम होतं. पण, १२ दिवसानंतर या महिलेला ६ लाख ८६ हजार इतकं बिल लावण्यात आलं. बिल लावलं ते लावलं पण, त्यात ही पोटच्या मुलाला गमावल्याने दुःखातून सावरण्यापूर्वीच फोर्टिस हॉस्पिटलने मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून ३६ हजार रुपये वसूल केले आणि उर्वरित पैशांसाठी तगादा लावला. या प्रकरणात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मध्यस्थी करत पैसे कमी करण्याचं आवाहन केलं.

- Advertisement -

या रुग्णालयात छोट्या छोट्या तपासण्यांसाठीही खूप पैसे घेतले जातात. त्यामुळे अशा रुग्णालयांवर शासनाने दबाव टाकला पाहिजे. आमच्याकडे लोकं स्वत:च तक्रारी घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये सुरू असलेले चुकीचे कारभार खरंच कुठेतरी थांबले पाहिजेत. या आधीही मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील लूटमारीचा प्रकार समोर आला होता. त्यावेळीही आम्ही अशाच प्रकारे त्या रुग्णालयात गेलो होतो आणि तेथील प्रशासनाला जाब विचारला होता.
– संजय माशिलकर, शिवसैनिक

त्यामुळे एकही रुपया न भरता दिला डिस्चार्ज 

हा सर्व प्रकार समोर आणला आहे, तो म्हणजे शिवसेनेच्या काही आमदार आणि कार्यकर्त्यांनी. फोर्टिस रुग्णालयाने आतापर्यंत कशापद्धतीने गरीब रुग्णांची उपचारांच्या नावाखाली कशाप्रकारे फसवणूक केली, याचा सर्व रिपोर्टच संजय माशीलकर यांनी पुराव्यासह फोर्टिस रुग्णालय व्यवस्थापनासमोर ठेवला. १ लाख ७१ हजार तपासणींचे, १ लाख ४१ हजार रक्ताचे, १ लाख ३ हजार डॉक्टरच्या व्हिजिटचे या सगळ्याचे जाब आणि कागदपत्रे याची मागणी प्रशासनाकडे केली. पण, या बाबतीत रुग्णालय प्रशासन योग्य पद्धतीने पुरावा आणि आपली बाजू मांडू शकले नाहीत. त्यामुळे या महिलेला एकही रुपया न भरता डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय, भरलेले ३६ हजार रुपये ही परत देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -