घरक्राइमFadnavis Threat:फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी; मुख्य आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

Fadnavis Threat:फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी; मुख्य आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

Subscribe

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल युट्यूब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य केलं होतं, तसंच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी किंचक नवले (34) याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. या आरोपीला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Fadnavis Threat Arrested for threatening to kill Devendra Fadnavis Police custody till March 7)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. समजाता तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडीओतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांना ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेला व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला साताऱ्यातून अटक करण्यात आली असून, त्याची 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

- Advertisement -

व्हिडीओ व्हायरला झाल्यानंतर पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवलेचा शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं तपासात समोर आलं. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली आहे. हा व्हिडीओ आपल्या एक्स हँडलवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयात हजर केले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जीवे ठार मारण्याची धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आणि तो व्हिडीओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करत व्हायरल केला, या कटात आणखी कोण सामील आहे, याबाबतच्या चौकशीसाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असं म्हणणं पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलं. न्यायाधीशांनी नवलेची दहा दिवसांच्याऐवजी पाच दिवसांची कोठडी पोलिसांनी मंजूर केली.

- Advertisement -

तसंच, या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेला योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. त्यालाही 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा: Indian Railway: ऐकावं ते नवलच, क्रिकेट सामन्यामुळे झाला ‘तो’ अपघात, रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं कारण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -