घरमुंबई'बळीराजाचं राज्य यावं';शपथविधीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची अपेक्षा

‘बळीराजाचं राज्य यावं’;शपथविधीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची अपेक्षा

Subscribe

आम्ही आमच्या नगरच्या आमदाराची निवड ही केवळ शेतकऱ्यांचे विषय सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे. शेतकर्‍यांना येत्या काळात काहीतरी दिलासा मिळेल अशीच अपेक्षा आम्हाला नवीन सरकारकडून आहे. सुका, ओला दुष्काळाचे चटके अजुनही संपता संपत नाही. पण नव्या सरकारने शेतकऱ्यांच्या विषयाला घातलेला हात पाहता हे सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा आम्हाला आहे, असे नगरमधून आलेले शेतकरी म्हणाले. अहमदनग येथून ८१ वर्षीय शेतकरी आज शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. नवे सरकार शेतकऱ्यांचा विचार करेल या आशेने ते शपथविधीसाठी मुंबईत आले होते.

‘वीजदर, पाणी यासारख्या गोष्टी तरी शेतकऱ्यांसाठी स्वस्त कराव्यात’

नाशिकमधील शेतीला गेल्या दोन वर्षात बसलेला फटका आणि शेतीचे झालेले नुकसान त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट कळत होते. यंदाही सोयाबीन, कापुस, मका, कांदा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा मोसंबीची बाग पाण्याअभावी जळाली. मजुरीपासून ते बियाणांचा सगळा पैसा बुडाला. पण भाजप सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीचा बांध फुटला नाही. शेतकऱ्यांसाठी केवळ कागदावर घोषणा करणारं सरकार म्हणून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना पोहचवल्या नाहीत. नव्या सरकारने किमान वीजदर, पाणी यासारख्या गोष्टी तरी शेतकऱ्यांसाठी स्वस्त कराव्यात, असे मत त्यांनी मांडले. ओल्या दुष्काळाच्या काळात झालेले पंचनामे पाहता काही विशेष मदत मिळेल अशी अपेक्षा नाही. पण यापुढच्या काळात तरी नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -