घरमुंबईपुरानंतर दिव्यात आजारांची भीती

पुरानंतर दिव्यात आजारांची भीती

Subscribe

दुर्गंधी,अस्वच्छतेच्या विळख्यात बेघर रहिवासी

मुसळधार पावसाने ठाण्यातील बहुतेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका हा दिवा या भागाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या माध्यमातून येथे फवारणी किंवा आरोग्य शिबिरे राबविली जात असली तरी एकीकडे असलेले डम्पींग आणि दुसरीकडे पूर ओसरल्यामुळे वाढलेली अस्वच्छता यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य मात्र संकटात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दिव्यातही पाऊस थांबला आहे. मात्र तब्बल 72 तासानंतर आता पुर ओसरल्यानंतर जे काही चित्र दिव्यात दिसत आहे. ते फारच विदारक आहे. परंतु ही परिस्थिती केवळ पुरामुळे नाही, तर येथील अनाधिकृत चाळी आणि इमारतींमुळे येथील अवस्था अतिशय वाईट झाली आहे.

- Advertisement -

अनधिकृत वसाहतींना फटका
स्वत:त घरे मिळतात म्हणून अनेक सर्वसामान्य नागरीकांनी दिव्यात घरे घेतली. 2000 सालापर्यंत या भागात कांदळवन बहरल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर या भागात भरणी पडत गेली आणि आज केवळ काही पैशांसाठी अनेकांनी येथे अनाधिकृत चाळी आणि इमारती उभारल्या. त्याचा फटका आज येथे वास्तव्यास आलेल्या सर्वसामान्य नागरीकांना बसल्याचे दिसून आले आहे. पूर ओसरला असला तरी अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. कुठे घरातील गाद्या, उशा, कपडे, इलेक्ट्रॉनीक वस्तु, घरातील फर्नीचर लोकांनी कचराकुंडीत टाकून आपला जीव रहिवाशांना वाचविला आहे. तीन दिवस घरात पाणी,वीज दिवाबत्ती नाही, पिण्याचे पाणी नाही अशा अनेक परिस्थितीत दिवावासीय अडकले आहेत.

मागील पाच ते सहा दिवसापासून दिव्यातील नागरीक नरक यातना भोगत आहेत. डोक्यावर छप्पर नाही, पोराबाळांसह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आणि हातात ताट घेऊन जेवणाच्या रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. पावसाने अतिशय हाल सुरु असतांना बाजूला असलेल्या डंपिंगचा वास आता आणखी वाढू लागला आहे. ठिकठिकाणी पूर ओसरल्याने माश्या किटक डास वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाटेत कुठे प्राणी मृत आहेत, तर कुठे उंदीर, घुशी मेलेल्या दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -