घरमुंबईकेडीएमसीत वावरताना असुरक्षित वाटते - महिला नगरसेवक

केडीएमसीत वावरताना असुरक्षित वाटते – महिला नगरसेवक

Subscribe

पालिका अधिकाऱ्याकडून अशी घटना घडत असतील तर महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झालीय

कल्याण- डोंबिवली महापालिकेतील लिपिकाने एका महिलेकडे लाच म्हणून शरीर सुखाची मागणी केली होती. या घटनेचे पडसाद शनिवरच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. आम्हालाही केडीएमसीमध्ये वावरताना असुरक्षित वाटू लागले आहे, असा सूर महिला नगरसेविकांनी व्यक्त केला. दरम्यान, राजपूत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश सभापती दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.


हेही वाचा – याकरता लिपिकाने केली चक्क शरीरसुखाची मागणी

- Advertisement -

लिपीकाचे निलंबन केले

शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आयत्या वेळचा विषय मांडला होता. त्यावेळी लिपिक रमेशचंद्र राजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचा विषयावर चर्चा झाली. त्यावेळी सर्वच महिला नगरसेवकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. पालिका अधिकाऱ्याकडून अशी घटना घडत असतील तर महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झालीय, असे नगरसेविका कस्तुरी देसाई म्हणाल्या. त्यामुळे या अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी नगरसेविकानी केली. पालिका उपायुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले की, त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात यईल असे त्यांनी स्पष्ट केलं.

मुदतवाढीसाठी केली शरीरसुखाची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचाराचा घृणास्पद प्रकार घडला आहे. थकीत मालमत्ता कराला मुदतवाढ मिळावी व मालमत्ता कर कमी करावा यासाठी पालिकेतील लिपीकाने लाच म्हणून चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. रमेशचंद्र राजपूत असे या लिपीकाचे नाव असून, ठाणे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने त्याला मैदानात रंगेहात अटक केली. महापालिकेत एकिकडे अंदाजपत्रक सादर होत असतानाच दुसरीकडे हा प्रकार घडल्याने विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनावर तीव्र टीका केली होती. त्यानंतर या लिपीकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -