घरमुंबईपरळ टर्मिनसचे आज लोकार्पण

परळ टर्मिनसचे आज लोकार्पण

Subscribe

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते परळ टर्मिनसचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगरचेंगरीच्या दुर्घटनेनंतर परळ टर्मिनस उभारण्याच्या योजनेला चालना मिळाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकर परळ टर्मिनसच्या प्रतिक्षेत होते. अखेर मुंबईकरांची प्रतिक्षा संपली आहे. कारण आजपासून परळ टर्मिनस प्रवांशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याहस्ते या टर्मिनसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सांध्यकाळच्या सुमारास पियूष गोयल हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. परळ टर्मिनसवरून १६-१६ लोकल अप आणि डाऊन मार्गावरून धावणार आहेत.

या वेळेत धावणाऱ्या लोकल

परळ टर्मिनसवरून पहिली परळ लोकल ही सकाळी ८.२१ तर धिमी लोकल ८.३८ वाजता धावणार आहे. तसेच ११.०५ आणि ११.१५ वाजता शेवटची जलद आणि धिमी लोकल धावणार आहेत. परळ टर्मिनसमुळे दादर स्टेशनला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे.

- Advertisement -

अखेर आजपासून खूले

दादर स्टेशनवर दिवसेंदिवस गर्दी ही वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकलवर पडणारा ताण, तसेच एल्फिन्स्टन म्हणजेच आताचे प्रभादेवी स्टेशनवर झालेली दुर्घटना, परळ स्टेशनवरील वाढलेली गर्दी या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन परळ टर्मिनस उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१५ या परळ टर्मिनसची घोषणा करण्यात आली होती. अखेर आज परळ टर्मिनस प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.

लोकार्पण सोहळा पार पडला

पीयूष गोयल यांच्या हस्ते परळ टर्मिनसचे लोकर्पण सोहळा संपन्न झाला. डिजीडल स्थानकाची सुविधा देणार असल्याचे तसेच धारावीच्या विकासाला चालना देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढच्या वाटचालीमध्ये अजूनही कामे करायची आहेत असेही पीयूष गोयल यांना सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -