घरमुंबईपरळ येथील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, चौघांचा मृत्यू

परळ येथील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, चौघांचा मृत्यू

Subscribe

टॉवरमधील रहिवाशी घटनास्थळी अडकले असल्याने युद्धपातळीवर मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. आग आटोक्यात येत असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परळ येथील क्रिस्टल केअर टॉवरच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग लागण्याची घटना आज सकाळी ८ वाजून ३४ मिनीटांनी घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळेस आग लागल्यामुळे टॉवरमधील रहिवाशी घरातच होते. आग लागण्याच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. काही रहिवाशी इमारतीत अडकले होते या अडकलेल्या नागरिकांना काढण्यात आले. १२ व्या मजल्यावर ही घटना घडल्यामुळे लोकांना बाहेर काढण्यास अडथळा येत होता. घरात आग लागल्यामुळे रहिवाशी जीव वाचवण्यासाठी गॅलरीत उभे राहिले होते. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार इमारतीतील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. मात्र येथील १६ जणांना परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याचे डेप्युटी डीन डॉ. बांगर यांनी सांगितले. मृतांमध्ये एक जेष्ठ महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. आगीत बबलू शेख (३६) आणि शुभदा शिर्के (६४) या दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोन मृतदेहांची ओळख पटली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -