घरदेश-विदेशकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

Subscribe

मुंबईच्या पश्चिम उपनगरात कामत यांचे वर्चस्व होते. गुरुदास कामत यांचे सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळचे संबंध होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतल्या चाणक्यपुरी येथील प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे नेतृत्व हरपले अशी भावना व्यक्त केली जात आहे.

ट्विटवरुन ‘बकरी ईद’च्या  शुभेच्छा

आज बकरी ईद आहे. गुरुदास कामत यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. निधनापूर्वी त्यांनी हे ट्विट केले होते.

- Advertisement -

मुंबईत कामत यांचे वर्चस्व

२००३ साली कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००९ साली मुंबईतील लोकसभेच्या उत्तर- पश्चिम मतदार संघातून  ते निवडून आले. उत्तर पूर्व मतदार संघातून ते ४ वेळा निवडून आले. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचे वर्चस्व होते. गुरुदास कामत यांचे सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळचे संबंध होते .२०१३ साली अखिल भारतीय काँग्रेस समितीवर त्यांची महासचिव पदावर नियुक्ती झाली. राजस्थान, गुजरात, दादरा- नगर हवेली, दिव- दमणची जबाबदारी त्यांच्याकडे सोपावण्यात आली होती. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमधील वादामुळे काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला.

- Advertisement -

 कामत यांचा अल्प परिचय

गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ साली कर्नाटकातील अंकोला झाला. मुंबईच्या आर. ए. पोद्दार महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गर्व्हमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली. पेशाने ते वकिल होते. १९७२ साली विद्यार्थी नेता म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. त्यांनतर १९८७ साली भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००३ साली ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर २००९ ते २०११ या काळात आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गृहमंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. या शिवाय त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची सांभाळली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -