घरमुंबईवसईत टॅक्सीने घेतला पेट; १५ गाड्या जळून खाक

वसईत टॅक्सीने घेतला पेट; १५ गाड्या जळून खाक

Subscribe

सूत्रांनुसार, आता ही आग पूर्णत: विझली असून तेथील परिस्थिती आटोक्यात आली आहे.

वसईच्या मलजी पाडा येथील कॅब पार्क यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका टॅक्सीने आज पहाटे अचानक पेट घेतला. काही वेळातच या आगीने भीषण स्वरुप धारण केले. झपाट्याने पसरत गेलेल्या या आगीमध्ये पार्किंग यार्डमध्ये उभ्या असलेल्या १५ गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या आगीत जवळपास १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान घटनेची माहिती मिळताच तेथे पोहचले आणि त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु केले. वाऱ्यासोबत पसरत चाललेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सूत्रांनुसार, आता ही आग पूर्णत: विझली असून तेथील परिस्थिती आटोक्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे मलजी पाडा पार्किंग लॉटमधील एका टॅक्सीने पेट घेतला. जोराचा वारा आणि अन्य गाड्यांच्या टायर्समुळे काही वेळातच या आगीने भीषण स्वरुप धारण केले. आग इतकी वाढत गेली की जवळपास १५ गाड्या या आगीच्या भक्षस्थानी आल्या. मात्र, या सुदैवाने यामध्ये कुणालाही आपले प्राण गमवावे लागले नाहीत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा शोध घेतला जात आहे.


वाचा : २४ तासांत राममंदिराचा प्रश्न निकाली काढू – योगी आदित्यनाथ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -