घरमुंबईतळोजा येथील टायर गोदामाला भीषण आग

तळोजा येथील टायर गोदामाला भीषण आग

Subscribe

तळोजा येथील नावडे फाटा परिसरात असलेल्या टायरच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईतील तळोजा, नावडे फाटा येथील टायर गोदामाला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या आगीत हे गोदाम भस्मसात झाले आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. सध्या आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहेत. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असले तरीही या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एमआयडीसी परिसरात असल्याने या गोदामाच्या आजूबाजूला केमिकलच्या कंपन्या आहेत. ही आग पसरून या केमिकल कंपन्यांमध्ये पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -