घरक्रीडाएमसीए बांधणार मुंबई विद्यापीठासाठी मैदान

एमसीए बांधणार मुंबई विद्यापीठासाठी मैदान

Subscribe

कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेमध्ये मैदान विकसित करून देण्याची जबाबदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) उचलली आहे. याबाबत पुढील आठवड्यात एमसीएचे पदाधिकार्‍यांकडून विद्यापीठातील जागांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे मुंबई विद्यापीठावर मैदानाअभावी क्रिकेट सामने भरवण्याची नामुष्की येणार नाही.

मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा घेण्यात येतात. गतवर्षी मुंबई विद्यापीठाच्या संघातील सहा खेळाडू ही स्पर्धा अर्धवट सोडून एमसीएकडून भरवण्यात येणार्‍या मुंबई प्रिमियर लीग खेळण्यासाठी गेले. त्यामुळे विद्यापीठावर नऊ खेळाडू घेऊन खेळण्याची नामुष्की आली व विद्यापीठाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईमुळे एमसीएने विद्यापीठाला मैदानाच उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाच घेण्यात आल्या नाही. याबाबत ‘आपल महानगर’ने ‘आंतरकॉलेज स्पर्धेसाठी विद्यापीठला मुहूर्त सापडेना’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, मिलिंद साटम, शीतल शेठ, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन ही स्पर्धा सुरू होण्याबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. यावर वायकर यांच्या दालनात विद्यापीठ अधिकारी, एमसीए अधिकारी व सिनेट सदस्यांची गुरुवारी बैठक बोलवण्यात आली.

- Advertisement -

बैठकीमध्ये एमसीएने विद्यापीठाला स्वतंत्र मैदानात विकसित करून देण्याची तयारी दर्शवली. त्याबाबत लवकरच विद्यापीठ व एमसीएमध्ये करार होणार आहे. परंतु त्यापुर्वी पुढील आठवड्यात एमसीएचे पदाधिकारी कलिना येथील विद्यापीठाच्या मोकळ्या असलेल्या जागांची पाहणी करून मैदान विकसित करण्याबाबत निर्णय घेणार आहेत. एमसीएकडून विकसित करण्यात येणार्‍या मैदानाचा 75 टक्के वापर विद्यापीठला तर 25 टक्के वापर एमसीएला करता येणार आहे. एमसीएकडून विकसित करण्यात येणार्‍या मैदानामुळे यापुढे विद्यापीठाला आंतरकॉलेज क्रिकेट स्पर्धेसाठी एमसीएवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या स्पर्धा सुरळीत पार पडतील.विद्यापीठाकडून कारवाई केलेल्या सहा विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घ्यावी. तसेच मुंबई विद्यापीठ व एमसीएने एकमेकांना दिलेले पत्रे मागे घेण्यात यावी, असे निर्देशही रायकर यांनी दिले.

खेळाडूंना बाँड बधनकारक                                                                                                विद्यापीठाकडून क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंकडून बाँड लिहून घेण्यात यावा अशा सूचना सिनेट सदस्यांनी मांडल्या. ही सूचना मान्य करत यापुढे स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांकडून बाँड लिहून घेण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ व एमसीएच्या अधिकार्‍यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -