घरमुंबईअकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 57 हजार 323 विद्यार्थ्यांचा समावेश

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 57 हजार 323 विद्यार्थ्यांचा समावेश

Subscribe

अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ही काल बुधवारी (ता. 21 जून) सायंकाळी जाहीर करण्यात आली. यावेळी मुंबईतील तब्बल 01 लाख 36 हजार 229 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेश मिळाला आहे.

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती ती अकरावी प्रवेशाची. अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ही काल बुधवारी (ता. 21 जून) सायंकाळी जाहीर करण्यात आली. यावेळी मुंबईतील तब्बल 01 लाख 36 हजार 229 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेश मिळाला आहे. तर यातील 57 हजार 323 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीमध्ये त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवता आलेला आहे. तसेच दुसऱ्या पसंती क्रमानुसार 21 हजार 934 विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

हेही वाचा – Narendra Modi : योग भारतातून आला, जुनी परंपरा; पंतप्रधानांचे योग दिनानिमित्त अमेरिकेत वक्तव्य

- Advertisement -

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगर शेत्र परिसरातील इयत्ता अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे यातीलच पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे यंदाच्या वर्षी कट ऑफ हा 90% पेक्षा अधिक लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीची वाट पाहावे लागणार आहे यामध्ये नामवंत महाविद्यालयातीलच कट ऑफ लिस्ट ही 90 च्या पार गेली असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेले आहे त्यासोबतच मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय आणि मान्यता फक्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झालेली होती त्यामध्ये दोन लाख 33 हजार 563 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केलेली होती सेल्फ फायनान्स आणि इतर अभ्यासक्रमान बरोबरच कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या कट ऑफ मध्ये देखील यंदाच्या वर्षी वाढ झाल्याचे सांगण्यात आलेले आहे

जाहीर करण्यात आलेली पहिली गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांना ऑनलाइन देखील पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 1thadmission.org.in संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा विभाग निवडावा लागणार आहे. नंतर अलॉटमेंट लिस्टवर क्लिक करून झोन, परिसर, महाविद्यालय, शाखा, शाखा कोड आणि फेरी नंबर ही संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. यानंतर गेट अलॉटमेंट लिस्ट किंवा गेट कट ऑफ वर क्लिक करून विद्यार्थी त्यांचे कोणत्या महाविद्यालयात नाव आले की नाही, हे तपासू शकतात. प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या यादीत नाव असलेल्य विद्यार्थ्यांना 27 जून पर्यंत त्यांच्या जागा निश्चित करणं आवश्यक आहे.

- Advertisement -

यावर्षी मुंबईतील अनेक नामवंत महाविद्यालयातील कॉलेजची पहिली कट ऑफ लिस्ट ही 90 टक्क्यांपेक्षा अधिकला बंद झाली आहे. यामध्ये एच आर कॉलेज, चर्चगेट, सेंट झेवीयर्स कॉलेज, एन एम कॉलेज, रुईया कॉलेज, पोदार कॉलेज, रुपारेल कॉलेज, जय हिंद कॉलेज या महाविद्यालयांच्या कट ऑफ लिस्ट 90 टक्क्यांच्या पार गेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -