घरनवी मुंबईसिडकोतर्फे नवी मुंबईतही लवकरच धावणार मेट्रो, अशी असणार मार्गिका

सिडकोतर्फे नवी मुंबईतही लवकरच धावणार मेट्रो, अशी असणार मार्गिका

Subscribe

नवी मुंबईतील या पहिल्या मेट्रोच्या मार्गिकेला CMRS प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने लवकरच आता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे.

मुंबईत मेट्रो सुरू झाल्यापासून नागरिकांचा प्रवास सुखकर झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना देखील आता ही सुविधा मिळावी, असा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आला होता. सिडकोच्या या प्रस्तावाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) कडून हिरवा कंदील मिळाला असून सीएमआरएसचे प्रमाणपत्र सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 ला देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता लवकरत नवी मुंबईकरांना बेलापूर ते पेंधरदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा – अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 57 हजार 323 विद्यार्थ्यांचा समावेश

- Advertisement -

नवी मुंबईत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहे. सिडको नवी मुंबईमार्फत हे काम करण्यात येत आहे. यातील बेलापूर ते पेंधर या मार्गाचे काम प्रथमतः हाती घेण्यात आलेले आहे. सिडकोतर्फे मार्ग क्र. 1 च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र.1 च्या अंमलबजावणीसाठी सिडकोला ICICI बँकेकडून 500 कोटी रुपयांचा आर्थिक पुरवठा करण्यात आलेला आहे.

नवी मुंबईतील या पहिल्या मेट्रोच्या मार्गिकेला CMRS प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने लवकरच आता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये मार्ग क्र. 1 वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या पाच स्थानकांदरम्यान मेट्रो धावण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. आता मार्ग क्र. 1 वरील पेंधर ते बेलापूर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र. 1 प्रवासी वाहतुकीकरिता सुरू करण्यात येणार आहे.

सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन 1 च्या यशस्वी परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्र.१ वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली असताना दिली.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -