घरमुंबईनवीन वर्षातील पहिलं अवयवदान, मिळाले तिघांना जीवदान!

नवीन वर्षातील पहिलं अवयवदान, मिळाले तिघांना जीवदान!

Subscribe

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पहिलं कॅडेव्हर डोनेशन पार पडलं आहे. मुंबईत ४८ वं अवयवदान झालं आहे.

अवयवदानाविषयी सतत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे लोकं आता पुढाकार घेत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पहिलं कॅडेव्हर डोनेशन पार पडलं आहे. मुंबईत ४८ वं अवयवदान झालं आहे. विरारला राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने अवयवदान करुन तिघांचे प्राण वाचवले आहेत. या महिलेला गंभीर ब्रेन हेमरेजमुळे वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांना ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. त्यानंतर अवयवदान समितीने त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाचं महत्त्व समजावून सांगितलं. महिलेच्या अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समुपदेशनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानासाठी सहमती दिली.

हेही वाचा – अवयवदान करा…तोच आमचा आहेर !

- Advertisement -

यकृत, किडनी आणि डोळे केले दान

या महिलेचे एकूण तीन अवयवदान करण्यात आले आहेत. यकृत, किडनी आणि डोळे (कॉर्निया) हे अवयवदान करण्यात आले आहेत. याविषयी वोक्हार्ट हॉस्पिटलचे अवयवदान समन्वयक रवी हिरवानी यांनी सांगितलं की, ” या महिलेने केलेल्या अवयवदानामुळे तिघांचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवल्यामुळे महिलेचे कॉर्निया, किडनी आणि यकृत दान करण्यात आले आहेत. या महिलेची किडनी आजच वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दान केली आहे. तर, यकृत ग्लोबल हॉस्पिटल आणि कॉर्निया रोटरी क्लब मध्ये पाठवले आहेत. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच हे दान करण्यात आले आहे. महिलेची दुसरी दान करण्यासाठी योग्य नसल्यामुळे ती दान करण्यात आली नाही. ”


हेही वाचा – महिलेच्या अवयवदानामुळे ५ वर्षाच्या मुलाला जीवदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -