घरमुंबईBMC कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड छाटलं! ५ जणांना अटक

BMC कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड छाटलं! ५ जणांना अटक

Subscribe

झाड कापल्याची घटना घडल्या नंतर दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी स्वता घटनास्थळी जाऊन केली होती पाहणी.

रस्त्याच्या कडेला जाहिरातीच्या बॅनरचे जास्त पैसे मिळावे म्हणून मंगळवारी रात्री काही लोकांनी गिरगाव चौपाटी जवळ असलेल ब्रिटिश कालीन वडाच झाड कापल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी जेव्हा त्यांना याबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याच सांगितले आणि हे झाड कापण्यासाठी महानगर पालिकेने परवानगी दिली असल्याचेही बतावणी त्यांच्याकडून करण्यात आली. स्थानिकांनी या प्रकरणाच ट्विट उद्धव ठाकरे यांना केलं आणि याची दखल खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी स्वतः झाड कापलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिकांनी घडलेला सर्व प्रकार आदित्य ठाकरे यांना सांगितला त्यानंतर महानगरपालिकेला विचारणा केल्यावर महानगरपालिकेने असे कुठलेही आदेश दिले नसल्याचा स्पष्ट केलं आणि झाड कापणारी हे लोकं महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते हे सुद्धा लक्षात आलं.

- Advertisement -

पोलिसांकडून ५ जणांना माहीम परिसरातून अटक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे जातीने या प्रकरणात लक्ष घालत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ या संदर्भात गुन्हा नोंदवला आणि युद्धपातळीवर याचा तपास सुरू केला. यावेळी एक तपास पथक बनवण्यात आलं आणि त्यांनी हे झाड कापणाऱ्यांचा शोध सुरू केला. शेवटी पोलिसांना यश आलं आणि शनिवारी पोलिसांनी ५ लोकांना माहीम परिसरातून अटक केली. हिरालाल सेवकराम दर्शन वय ३६ आणि मोहम्मद शफीक उर्फ अब्दुल इकबाल वय २५ अशी पाच पैकीं दोन आरोपींची नावं असल्याचे समोर आले आहे.

बॅनर लावल्यानंतर हे झाड मध्ये येत होतं ज्यामुळे पैसे कमी मिळत होते आणि म्हणून हे झाड कापल्याची माहिती या लोकांनी दिली. फक्त हेच झाड नाही तर मुंबईमध्ये अशी अनेक झाडं या लोकांकडून कापण्यात आल्याचं ही या लोकांनी मान्य केलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा निवासस्थान असलेल्या मलाबार हिल परिसरामध्ये सुद्धा या लोकांनी अशाच प्रकारे झाडं कापल्याच समोर आले असून मलबारहिल पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अशाप्रकारे झाड कापत असताना जर कोणी यांना या बाबत विचारलं तर हे स्वतःला महानगरपालिकेचे कर्मचारी सांगायचे. त्यामुळे पोलिसांना ही कधी यांचा संशय आला नाही. मात्र हा सर्व प्रकार ते कोणाच्या सांगण्यावरून करत होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त राजीव जैन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण मांढरे, पोलीस हवालदार विजय आवकीकर, आणि पोलीस शिपाई बळीराम मोरे या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -