घरताज्या घडामोडीराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरुन विरोधकांना टोला लगावला. विरोधक राष्ट्रपतींचं अभिभाषण ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण राष्ट्रपतींच्या भाषणाचा परिणाम एवढा आहे की विरोधक भाषण न ऐकता देखील बरंच काही बोलत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. दरम्यान, मोदी यांनी त्यांच्या भाषणात कोरोना काळाचा देखील उल्लेख केला. कोरोना संकटाचा कुणी विचारही केला नसेल. कोरोनाविरुद्ध लढा जिंकण्याचं श्रेय सरकारचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, देश आता स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात दाखल होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने देशासाठी काहीतरी करण्यावर भर दिला पाहिजे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात मैथिलीशरण गुप्त यांची कविता ‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है’ वाचून दाखवली. २१ व्या शतकात मैथिलीशरण गुप्त यांनी असे लिहिले असते की, “… अरे भारत, आत्मनिर्भरच्या मार्गावर धाव,” असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -