घरमुंबईMNS च्या दणक्यानंतर FLIPKART ही मराठीत

MNS च्या दणक्यानंतर FLIPKART ही मराठीत

Subscribe

फ्लिपकार्टने आपल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये बदल करत लवकरच अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान चार दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉननेही आपल्या अ‍ॅपमध्ये लवकरच मराठीचा समावेश करण्याचे जाहीर केले होते.

दसरा-दिवाळीमध्ये जोरदार ऑफरच्या माध्यमातून बिजनेस करणार्‍या ई-कॉमर्स साईट्सना त्यांचे अ‍ॅप मराठीमध्ये आणण्यासाठी मनसेने मागील आठवड्यात दणका दिला होता. त्यानंतर आता फ्लिपकार्टने आपल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये बदल करत लवकरच अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान चार दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉननेही आपल्या अ‍ॅपमध्ये लवकरच मराठीचा समावेश करण्याचे जाहीर केले होते.

अ‍ॅमेझॉनपाठोपाठ आता फ्लिपकार्टनेही त्यांच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टकडून नुकतेच अखिल चित्रे यांच्या मेलला प्रतिसाद देण्यात आला आहे. यामध्ये फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये वर्षाअखेरीपर्यंत मराठीचा समावेश करण्यात येईल, असे फ्लपकार्टच्या पश्चिम विभागाच्या संचालक डिप्पी वाकानी यांनी ईमेलद्वारे मनसेला कळवले आहे. तसेच फ्लिपकार्टचे अ‍ॅप प्रादेशिक भाषांमध्ये आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अ‍ॅपमध्ये लवकरच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी भाषेसह अन्य काही भाषांचा समावेश करण्यात येणार असल्याचेही वाकानी यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ ऑक्टोबरला अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये मराठीचा उल्लेख करण्याचा इशारा दिला होता. सात दिवसांमध्ये अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश न केल्यास तुम्हाला दिवाळी धमाका नाही, तर मनसे धमाका दाखवू असा इशारा मनसे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस अखिल चित्रे यांनी दिला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनी दखल घेत त्यासंदर्भात बीकेसी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये यापुढे शंभर टक्के मराठी भाषेचा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

flipkart

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -