घरमुंबईदेवेंद्र फडणवीसांना कोरोनाची बाधा; स्वतः ट्वीट करून दिली माहिती

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची बाधा; स्वतः ट्वीट करून दिली माहिती

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून राजकीय क्षेत्रातील मंडळींना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र असे सतत दौरे करत असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करत त्यांना कोरोना झाला असल्याची माहिती दिली.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपाने त्यांच्यावर सोपवलेली असल्याने बिहारमध्येही ते सातत्याने फिरतीवर होते. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाले असल्याचे सांगितले जात आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी ट्विट करत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -