घरमुंबईसोशल डिस्टंसिंगचा फज्जा; दादरचे फुल, भाजी मार्केट सोमय्या, बीकेसी मैदानावर हलवणार

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; दादरचे फुल, भाजी मार्केट सोमय्या, बीकेसी मैदानावर हलवणार

Subscribe

गर्दीच्या ठिकाणी पालिकेकडून जास्त लक्ष दिले जात आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा विविध निर्बंध अधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करत गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी मुंबईतील काही भागांमध्ये अजूनही गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पालिकेकडून जास्त लक्ष दिले जात आहे. याच अनुषंगाने पालिकेने दादर येथील गर्दीचे ठिकाण असलेले फुल व भाजी मार्केट हे बीकेसी आणि सोमय्या येथे तात्पुरत्या स्वरूपात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर येथील फुल आणि भाजी मार्केटमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मागील काही दिवसांतही दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आला आणि अनेकांनी मास्कही घातलेला नव्हता. त्यामुळे आता पालिकेने दादरचे फुल आणि भाजी मार्केट हे बीकेसी आणि सोमय्या येथे हलवण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी मुंबईमध्ये २ हजार ३९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,४९,९४७ इतकी झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -