घरमुंबईपाडवा स्पेशल : या वर्षीही पाडव्यात 'झेंडू' वधारलेलाच

पाडवा स्पेशल : या वर्षीही पाडव्यात ‘झेंडू’ वधारलेलाच

Subscribe

 गुढीपाडवाच्या दोन दिवस आधीपासून दादर फुलबाजारत विक्रेत्यांची गर्दी होते. मात्र गेले काही वर्षापासून झेंडूचा भाव वधारलेलाच आहे.

दादर स्थानक आणि स्थानकाबाहेरील फुलमार्केट हे अगदी जगप्रसिध्द आहे. १९५० सालापासून दादर स्थानकाजवळच शेकडो फूलविक्रेते फुलांची विक्री करीत आहेत. त्याला विजयनगरचा फूलबाजार या नावाने ओळखले जाते. मीनाताई ठाकरे फूलबाजार हा दादर स्थानकापासून लांब असल्याने अधिकतर ग्राहक स्थानकाजवळील विजयनगरच्या बाजारात खरेदी करतो. सकाळी लवकर दादर स्थानकाबाहेर लगबग सुरू होते. फुलांनी गच्च भरलेले मोठमोठे ट्रक-टेम्पो पहाटे दादरच्या बाजारात जमा होतात. मात्र गुढीपाडवा, दसऱ्यानिमित्त ग्राहकांची विशेष गर्दी फुलबाजारत होते. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फुलांचा भाव हा चढाच राहिला आहे.

गुढीपाडवाच्या आदल्या दोन दिवसात सकाळी चारपासून बाजारात विक्रेत्यांची गर्दी होते. मीनाताई ठाकरे आणि विजयनगर हे दोन्ही बाजार घाऊक बाजार असले तरी येथे किरकोळ खरेदीही केली जाते. सण-उत्सवाच्या काळात तर या बाजाराला जत्रेचे स्वरूप येते. आणि किमतीही वधारतात.

- Advertisement -

दररोज ३० ते ४० रूपये किलोने असणारा झेंडू आज १०० रूपये किलोने विकला जात आहे. सध्या केशरी झेंडू, पिवळा झेंडू, शेवंती, बिजली, गुलाब, कवटी चाफा या फुलांची व आंब्याचे टाळे, केळीचे खांब आदींची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत आहे. ही फुले खरेदी करण्यासाठी उपनगरांतून मोठय़ा प्रमाणावर नागरिक या बाजारात येतात. मात्र, यंदा या बाजारातील फुले गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी महाग असून गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा-वीस रुपयांनी भावात आणखी वाढ झाली आहे.

सण म्हटल्यावर नेहमीच कृत्रीमरीत्या भाव वाढवले जातात. पण सण असल्यामुळे मिळेल्या त्या भावात आम्हाला फुलं घ्यावीच लागतात. याचाच फायदा विक्रेते घेतात. अशी तकरार सध्या ग्राहक करत आहेत.

- Advertisement -

फुलांचे दर

पिवळा झेंडू- १०० रुपये किलो

केशरी झेंडू- १०० रुपये किलो

शेवंती- १५० रुपये किलो

आंब्याचा डहाळा- २० रूपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -