घरदेश-विदेशऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी मिशेलकडून काँग्रेसच्या टॉप नेत्याचा उल्लेख

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी मिशेलकडून काँग्रेसच्या टॉप नेत्याचा उल्लेख

Subscribe

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने भ्रष्टाचाराच्या व्यवहाराच्या फाईलमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहीण्यात आलेल्या नावांचा खुलासा केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने भ्रष्टाचाराच्या व्यवहाराच्या फाईलमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहीण्यात आलेल्या नावांचा खुलासा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे. ईडीने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी काल, गुरुवारी कोर्टात चौथे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ईडीने म्हटले की, चौकशी दरम्यान या व्यवहाराच्या फाईलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या शब्दांच्या संक्षिप्त रुपांचा उलगडा मिशेलने केला आहे. त्याने सांगितले आहे की, fam या इंग्रजी शब्दाचा अर्थ फॅमिली असा होतो. तसेच AP म्हणजे काँग्रेसच्या एका टॉपच्या नेत्याचे नाव आहे. त्याचबरोबर इतरही काही संक्षिप्त शब्दांचे अर्थ म्हणजे हवाई दलातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे टॉप नेते यांची नावे आहेत. हा व्यवहारात ३ कोटी युरोचा भ्रष्टाचार झाला आहे.

मिशेलला दुबईतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणले 

ईडीने या आरोपपत्रात दावा केला की, या लोकांना भ्रष्टाचाराच्या पैशाच्या देण्यांसाठी गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अवलंब केला तसेच हवालाच्या मार्गे हे पैसे काढण्यात आले. या प्रकरणाची चौकशी ईडी आणि सीबीआयकडे आहे. यामध्ये माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्याही नावाचा समावेश आहे. या दोन्ही चौकशी समित्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहाराशी जोडलेल्या राजकीय संबंधांशी तसेच आर्थिक घोटाळ्याची चौकशी करीत आहेत. या चौकशी दरम्यान, मिशेलला दुबईतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्यात आले. त्यानंतर चौकशी पुढे सरकत असताना मिशेलकडून महत्वाची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -