घरमहाराष्ट्रसुबोध भावे करणार राहुल गांधी यांच्यावर बायोपिक

सुबोध भावे करणार राहुल गांधी यांच्यावर बायोपिक

Subscribe

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे हा राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करणार आहे.

अभिनेता सुबोध भावे आणि बायोपिक यांचे वेगळंच नातं तयार झाले आहे. सुबोध भावे कोणते नवीन काम करणार यांची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच असते. परंतु स्वतः सुबोध भावेने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या आगामी कामाबद्दल सांगितले आहे. अभिनेता सुबोध भावे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करण्याच्या तयारीत आहे. सध्या राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची चलती असून, आता राहुल गांधी यांच्यावर देखील बायोपिक येणार आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावे हा राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यातील स्थानिक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यावेळी सुबोधने राहुल यांच्यावर मी बायोपिक करणार असल्याचे जाहीर केले.

काय म्हणाला नेमकं सुबोध 

राहुल गांधींना बालपणी आजी व वडिलांच्या मृत्यूची घटना पाहावी लागली. एवढ्या लहान वयात दोन मोठे आघात त्यांनी पचवून एक मोठं नेतृत्व म्हणून उभे राहिले. या सगळ्यासाठी वाघाचं काळीज लागतं, असे सुबोध भावे सांगत राहुल यांचा बायोपिक मी करणार असल्याचे जाहीर केले. पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रमुख कार्यकर्त्यांची हजेरी

यावेळी, मंचावर आरजे मलिष्का व सुबोध भावे यांनी राहुल गांधींशी संवाद साधला. हा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. हडपसरमधील महालक्ष्मी लॉन्सच्या हॉलबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी उपस्थितांसाठी संगीत-नृत्य कार्यक्रमही झाले. या संवाद कार्यक्रमाला शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेर लावली. तत्पूर्वी, पुण्यातील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी यांनी कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्ट इन येथे राहुल गांधींची भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -