घरमुंबईटॉयलेटला जायचंय, स्टेशन बुकिंग कार्यालयात फोन करा !

टॉयलेटला जायचंय, स्टेशन बुकिंग कार्यालयात फोन करा !

Subscribe

तुम्हाला टॉयलेटला जायचे आहे, तर मग स्टेशन बुकिंग कार्यालयात फोन करा, अस कोणी सांगितले, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हा प्रकार खरा आहे. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकातील दिव्यांगांसाठी बांधलेले टॉयलेट हे दिवसरात्र बंद असते आणि त्याची चावी स्टेशन बुकिंग कार्यालयात असते.

तुम्हाला टॉयलेटला जायचे आहे, तर मग स्टेशन बुकिंग कार्यालयात फोन करा, अस कोणी सांगितले, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हा प्रकार खरा आहे. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकातील दिव्यांगांसाठी बांधलेले टॉयलेट हे दिवसरात्र बंद असते आणि त्याची चावी स्टेशन बुकिंग कार्यालयात असते. दिव्यांगांच्या टॉयलेटच्या दर्शनी भागावर केवळ एक फोन नंबर लिहिण्यात आला आहे. हा फोन नंबर स्टेशनवरील बुकिंग कार्यालयातील असून या ठिकाणी आपल्याला टॉयलेटची चावी मिळणार आहे. असा साक्षात्कार स्वतः दिव्यांगांना व्हायला हवा, अशी रेल्वेची अनाकलनीय अपेक्षा आहे.

या ठिकाणी गैरसोयीच्या टॉयलेटकडे दिव्यांग फिरकतही नाहीत. महिला दिव्यांगाची खूपच कुचंबना होत आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी बांधलेले टॉयलेट केवळ शोभेपुरतेच ठरले असून, रेल्वे प्रशासनाच्या याकारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ज्या बुुकींग ऑफीसमध्ये चावी ठेवलेली असते ते ऑफीस कल्याणच्या दिशेला फलाटाच्या शेवटी आहे. तर टॉयलेट छत्रपती शिवाजी टर्मिटसनच्या दिशेला फलाटाच्या शेवटी आहे. या पहिल्या मजल्यावरील बुकींग कार्यालयात चावी घ्यायला जाण्यासाठी पायर्‍या चढाव्या लागतात. दिव्यांग पायर्‍या चढून या कार्यालयात कसे पोहचतील याचे उत्तरही दिव्यांनीच शोधायचे आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे स्थानकावरील कोपर हे स्थानक आहे . डाऊन कोपर आणि अप्पर कोपर अशी दोन स्थानके याठिकाणी आहेत. अप्पर स्थानकावरून दिवा -वसई मार्ग जातो. तर डाऊन कोपर हा मध्य रेल्वेशी जोडला आहे. कोपर स्थानकातून दररोज साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. सुमारे ५२ लाखांच्या आसपास उत्पन्न आहे. मात्र त्या प्रमाणात प्रवाशांना सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील टॉयलेट दिवस रात्र सुरू असतात. पण मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकातील दिव्यांग प्रवाशांसाठी बांधलेले टॉयलेट हे अपवाद ठरते. डाऊन कोपर स्थानकावरील सीएसटीच्या दिशेला दिव्यांगांसाठी हे टॉयलेट बांधण्यात आले आहे. मात्र, हे टॉयलेटला २४ तास कुलूप असते. टॉयलेटची चावी स्टेशन बुकिंग ऑफिसमध्ये असल्याचा फलक त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. तसेच त्या फलकावर एक नंबर देण्यात आला आहे. मात्र, चावीसाठी या नंबरवर फोन करा, असा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे दिव्यांग प्रवासी नाईजालाने उघड्यावरच आपली अडचण दूर करीत असतात.

महिलांची खूपच कुचंबना होत असते. सीएसटीच्या दिशेला फलाटाच्या एक कोपर्‍यात हे टॉयलेट बांधण्यात आले आहे. याठिकाणी ओसाड परिसर आहे. येथे तृतीयपंथीयांचा वावर असतो. त्यांच्या भीतीने हे टॉयलेट बंद ठेवण्यात आल्याचे रेल्वे अधिकार्‍याचे म्हणणे आहे. तसेच टॉयलेटच्या वस्तूंची तोडफोड करून एक्झॉस्ट फॅन चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. कल्याण दिशेच्या बाजूला हे टॉयलेट बांधणे सोयीचे होते, मात्र हे अडगळीत पडलेले शौचालय बांधण्याची कल्पना रेल्वेच्या कोणत्या अधिकार्‍यांला सुचली, असा प्रश्न दिव्यांग प्रवाशांनी विचारला आहे.

- Advertisement -

 

तर चेंगराचेंगरी होऊ शकतेअप्पर कोपर स्थानकातून दिवा – वसई मार्ग जातो. येथून सकाळी ५ :३३ ची डोंबिवली- बोईसर व सकाळी १० वाजून १४ मिनिटाची दिवा-वसई ही पॅसेंजर असते. दोन्ही पॅसेंजरमध्ये बराच कालावधी असल्याने प्रवाशांची खूपच गर्दी होते. कोपर पुलावर गर्दी उसळत असल्याने चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सकाळी ९ च्या वेळेत एक गाडी सोडावी अशी मागणी प्रवाशांमध्ये होत आहे. हा पूल छोटा असल्याने तो पाडून नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच होम प्लॅटफॉर्म, सीएसटीकडे पादचारी पूल आदी कामांना रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कामाला पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळेल, असे सांगितले जात आहे.

 

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे टॉयलेट कुलूप बंद केले आहे. त्याची चावी स्टेशन बुकिंग कार्यालयात ठेवण्यात आली आहे. तसेच एक नंबर देण्यात आला आहे. दिव्यांगांनी फोन केल्यावर रेल्वे कर्मचारी चावी घेऊन येतो. याठिकाणी तृतीयपंथीयांचा वावर असतो. तसेच चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. सुरक्षा तैनात ठेवण्यात आला आहे.
-भूषण धाने, स्टेशन मास्तर, कोपर

फोटो आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -