घरफिचर्स..अन गोविंदा घरी परतलाच नाही

..अन गोविंदा घरी परतलाच नाही

Subscribe

पार्ल्यातील दहिहंडीला जास्त थर लावण्याच्या नादात आमचे थर कोसळले आणि दोघांना जबर मार लागला.त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.दुर्दैवाची शृखंला चालूच होती. दिवसाच्या या वाईट घटनांनी मी वैतागलो आणि तडक घरी आलो. काही तरी अघटीत घडणार असं वाटत होतं. त्यामुळे रात्री काही हंड्या बघितल्या आणि मी झोपलो. सकाळीच मित्राने फोन केला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली,

दिनांक 25 ऑगस्ट 2016 ची रात्र आमच्या गोविंदा पथकासाठी काळरात्र होती. आदल्या दिवशी म्हणजे 24 ऑगस्टला अष्टमी साजरी करून दुसरा दिवस म्हणजे गोपाळकाला. आम्हा तरूण आणि उत्साही मुलांना पर्वणीचा दिवस असतो. त्यामुळे नेहमी 9 वाजल्याशिवाय न उठणारे आम्ही सकाळी 6 वाजता उठून तयार होतो. दहिहंडी पथक म्हटल्यावर एकाच भागातील किंवा मंडळाचे पथक असले तरी मित्रांच्या ओळखीने मुंबई आणि आसपासचे तरूण त्या पथकांना जोडले जातात. मी पण त्या वर्षी अशाच मित्राच्या ओळखीने अशाच एका पथकात सामील झालो. जीवलग मित्र असले त्याचबरोबर उत्साह आणणारा दहिहंडीचा सण असला की असणारा आनंद हा अवर्णनीय असतो

त्या दिवसाची आमची सुरूवातही अशीच उत्साहात झाली. मित्राची बाईक आणि एकाच बाईकवर बसलेले तिघेजण. एकाच रंगाचे टिशर्ट घालून सकाळी जमलो. सर्वजण जमेपर्यंत सकाळचे 9.30 वाजले. प्रत्येक दहिहंडी पथकांच्या ठरलेल्या हंड्या असतात.आमचा पण मार्ग ठरला होता. कांदिवली ते बांद्रा या परिसरातील हंड्यांकडे सलामी द्यायचे आम्ही ठरवले. अखेर सकाळी 10 च्या सुमारास जल्लोष करत आम्ही निघालो. त्यावर्षी 20 फुटांवरील हंड्यांना संमती नसल्याने दहिहंडी पथकांत तसा निरूत्साह होता. काही ठिकाणी कोर्टाचे नियम धाब्यावर बसवलेही जात होते. सुरूवातीला आम्ही कांदिवलीतील काही हंड्या फोडल्या आणि पुढच्या प्रवासाला निघालो.सुरूवातीलाच कांदिवली आणि मालाडच्या दरम्यान आमच्या गाडीला अपघात झाला. कोणाला काही लागलं नसलं तरी दिवसाची सुरूवातच खराब झाली होती.

- Advertisement -

पार्ल्यातील दहिहंडीला जास्त थर लावण्याच्या नादात आमचे थर कोसळले आणि दोघांना जबर मार लागला.त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.दुर्दैवाची शृखंला चालूच होती. दिवसाच्या या वाईट घटनांनी मी वैतागलो आणि तडक घरी आलो. काही तरी अघटीत घडणार असं वाटत होतं. त्यामुळे रात्री काही हंड्या बघितल्या आणि मी झोपलो. सकाळीच मित्राने फोन केला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली, दिवसभर आमच्यासोबत असलेल्या आमच्या मित्राचा दहिहंडी मंडळाच्या मंडपात रात्री विजेचा झटका लागून मृत्यू झाला होता.ज्याच्या सोबत आम्ही दिवसभर फिरलो,रस्त्यावर ज्याच्यासोबत एकत्र पावभाजी खाल्ली, दिवसभर आम्ही ज्याची मस्करी केली तो आमचा मित्र अचानक आम्हाला सोडून गेला. आईवडिलांचा एकुलता एक लाडका,साधा माणूस असलेला आमचा मित्र आम्हाला कायमचा सोडून गेला होता.

माझ्या पुढ्यातच त्याने आपल्या कामावर आज सुट्टी घेतो,उद्या येईन असा मेसेज केला होता,तो आमचा मित्र पुन्हा दिसलाच नाही. आयुष्यातील काही घटना शब्दांत नाही सांगता येत,पण त्याला जाऊन आता दोन वर्षे होतील,त्याचं नावही लिहिणं उचित होणार आहे. कारण त्याच्या जाण्यानं धक्क्यात असलेले त्याचे आईवडील आता कुठे सावरायला लागलेत.माझ्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, ही दुर्दैवी घटना घडण्याआधी काही मिनिटं अगोदर त्याला आईचा फोन आला होता. मंडळाच्या मंडपात रात्री पावभाजी खाताना आई दहा मिनिटांत येतो गं ,पावभाजी पण आणतो असं तो म्हणाला. पण दहिहंडिच्या दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहात बाहेर पडलेला तिचा गोविंदा पुन्हा घरी परतलाच नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -