घरमुंबईपालघरमध्ये चार एके 47 राइफल्स जप्त

पालघरमध्ये चार एके 47 राइफल्स जप्त

Subscribe

13 कोटी 60 लाख 99 हजारांचे अंमली पदार्थ,3 लाख 85 हजार 900 रुपयांची हत्यारे, जीवंत काडतुसे

पालघर पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिल्हार फाटा येथे चार एके 47, 4 बंदुका, 63 जीवंत काडतुसे आणि तब्बल 13 कोटी 60 लाख 99 हजार 900 रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थ विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार दराडे यांनी आपल्या पथकासह मुंबई-अहमदाबाद हायवेवर मनोरजवळ चिल्हार फाटा येथे सापळा रचला होता. रविवारी रात्री सातच्या सुमारास चिल्हार फाटा येथील हिंदुस्थान ढाबा या हॉटेलमध्ये दोन संशयस्पद इसम दोन मोठ्या गोण्या घेऊन आले. दराडे यांनी त्यांची झडती घेतली असता शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थांचा साठा सापडला.

- Advertisement -

विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थांचा इतका मोठा साठा सापडल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी सुुरु केली आहे. हा साठा कुणाला विकण्यात येणार होता याचा पोलीस तपास करीत आहेत.त्यासाठी आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.

मॅगझीनसह चार एके 47, चार गावठी बंदुका, 63 जीवंत काडतुसे आरोपींकडून जप्त करण्यात आली. बाजारात याची किंमत सुमारे 3 लाख 85 हजार 900 रुपये इतकी आहे. तर आरोपींकडून तब्बल 13 कोटी 60 लाख 99 हजार 900 रुपये किंमतीचे अंमली पदार्थ सापडले. यामध्ये 12 कोटी 75 लाख रुपये किंमतीची 8 किलो 500 ग्राम वजनाची इफ्रेडीन पावडर, 45 लाख रुपयांची 8 किलो 900 ग्राम एमडी पावडर, 35लाख रुपयांची 500 ग्राम ब्राऊन शुगर, 2 लाख रुपये किंमतीची डोडो मार्फिन पावडर जप्त करण्यात आली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -