घरमुंबईऑनलाईन प्रक्रिया : ११ वीचे १९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

ऑनलाईन प्रक्रिया : ११ वीचे १९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

Subscribe

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण फेर्‍या आणि एक विशेष फेरीनंतरही तब्बल 19 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण फेर्‍या आणि एक विशेष फेरीनंतरही तब्बल १९ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या धर्तीवर विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीला अनेकांनी विरोधाचा झेंडा दाखविला आहे. मुख्य म्हणजे, अकरावी प्रवेशाच्या या गोंधळामुळे शिक्षण उपसंचालक विभागात विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. आपल्याला प्रवेश मिळेल ना? या प्रश्नाचे उत्तर शोधताना ते दिसत होते.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून यंदाही चार सर्वसाधारण फेर्‍या आणि एक विशेष फेरी आयोजित करण्यात आली होती. मात्र अल्पसंख्याक कॉलेजांचे न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामुळे आणि इनहाऊस कोट्यातील घोळामुळे यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला फटका बसला. अनेक विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्के गुण मिळवूनही नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश मिळालेले नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना चार फेर्‍यांनंतरही प्रवेश मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी विविध याद्यांमध्ये प्रवेश जाहीर झाल्यानंतरही आवडीचे कॉलेज नसल्याने प्रवेश घेतलेले नाहीत, त्यानुसार आतापर्यंत सुमारे 19 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवी विशेष प्राधान्य फेरी जाहीर केली आहे. या फेरीला अनेक पालकांनी विरोध केला असून शिक्षण विभागाने गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्याची मागणी मंगळवारी अनेक पालकांनी केली आहे.

- Advertisement -

प्रवेशाविना राहणार्‍या या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे ८० ते १०० टक्के गुण मिळवणारे, ६० टक्के आणि त्यावर गुण असलेले आणि ३५ टक्क्यांवरील गुण असलेले अशा तीन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या प्रवेशप्रक्रियेपूर्वी कॉलेजांतील रिक्त जागांचा तपशील शनिवार, २५ ऑगस्ट रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यांच्यासाठी वेळापत्रक का नाही?
अकरावी प्रवेशाविना राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्य फेरी जाहीर केली असली तरी अद्याप दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालकांनी वेळापत्रक जाहीर केलेले नाही. या प्रश्नाकडे मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी लक्ष वेधले आहे. या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

कॉलेजांना बसणार फटका
अद्याप प्रवेशाविनाच राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता प्राधान्य फेरी राबविण्यात येणार आहे. ही फेरी २ सप्टेंबर-पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे त्याचा थेट फटका कॉलेजांच्या वेळापत्रकाला बसणार असल्याची माहिती प्राध्यापकांकडून देण्यात आली आहे. तर प्रवेशाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात प्राध्यापक वर्गदेखील काम करीत असल्याने शिकवणे मागेच राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -