घरमुंबईकंटेनमेंट झोनमधील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन तिथल्या तिथेच

कंटेनमेंट झोनमधील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन तिथल्या तिथेच

Subscribe

गणेशोत्‍सव विसर्जनाच्‍या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्‍ये असेल तर त्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्‍सम व्‍यवस्‍था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाहीतर जर घरगुती गणपती असलेली इमारत अथवा चाळ जर ‘सिल्‍ड इमारत’ मध्‍ये असेल तर त्‍यांना विसर्जनासाठी घरगुती गणेशमुर्ती बाहेर घेवून जाण्‍यास परवानगी असणार नाही. त्‍यांना त्या गणेशमुर्तीचे विसर्जन बादलीमध्‍ये किंवा ड्रममध्‍ये करणे बंधनकारक राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे

कोविड-१९ या साथ रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा श्री गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन महानगरपालिका व शासनस्‍तरावरुन नागरिकांना करण्‍यात आले आहे. त्यामुळे यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्‍सव २०२० साजरा करतेवेळी आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिरातींना पसंती द्यावी. तसेच सांस्‍कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्‍तदान शि‍बीरे इत्‍यादी आयोजित करण्‍यास प्राधान्‍य द्यावे आणि त्‍याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्‍यू इत्‍यादी आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करावी.

- Advertisement -

विसर्जनाच्‍या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्‍थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्‍थळी कमीत-कमी वेळेत आणि कमीत-कमी लोकांच्‍या उपस्थितीत विसर्जन पार पाडावे. लहान मुले आणि वरि‍ष्‍ठ नागरिकांनी सुरक्षेच्‍या दृष्टिने विसर्जनस्‍थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्ती एकत्रितरित्‍या विसर्जनास नेऊन गर्दी करण्‍यास परवानगी असणार नाही, असेही महापालिकेचे सह आयुक्त व महापालिका बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सवाचे समन्वयक नरेंद्र बर्डे यांनी स्पष्ट केले. विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये. विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा. त्‍यांनी देखील मास्‍क वापरावे व सामाजिक अंतराच्‍या नियमांची काटेकोर पालन करावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -